Lucknow charbagh railway stationचं काय आहे वैशिष्ट्य?

74
Lucknow charbagh railway stationचं काय आहे वैशिष्ट्य?
Lucknow charbagh railway stationचं काय आहे वैशिष्ट्य?

भारतामध्ये रेल्वे स्थानकं असलेली प्रमुख पर्यटक आकर्षणे असलेली अनेक शहरं आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे उत्तर प्रदेशाची राजधानी असलेलं लखनऊ इथलं चारबाग रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकाला लाल आणि पांढऱ्या रंगांनी सजवलेलं आहे. या स्थानकाचं बांधकाम प्रचंड मोठं, घुमट आणि बुरुज असलेलं आहे. अतिशय सुंदर दिसणारी ही वास्तू लखनऊ इथल्या वैभवशाली वारशाची आठवण करून देते.

लखनऊमधल्या सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक असलेलं हे चारबाग नावाचं रेल्वे स्थानक खरोखरच खूप सुंदर आहे. १८६७ सालापर्यंत या ठिकाणी चार मोठ्या बागा अस्तित्वात होत्या. त्यावरूनच या रेल्वे स्थानकाचं नाव चारबाग असं पडलं. त्या चार बागांपैकी एक बाग आजही अस्तित्वात आहे. ही बाग रेल्वे स्थानकाच्या पलिकडेच आहे. प्रशस्त आणि मोठी अशी ही बाग रेल्वे स्थानकाचं सौंदर्य वाढवण्यासाठी अगदी पूरक आहे. (Lucknow charbagh railway station)

चारबाग रेल्वे स्थानकाचा इतिहास

चारबाग रेल्वे स्थानकाची पायाभरणी बिशप जॉर्ज हर्बर्ट नावाच्या अधिकाऱ्याने २१ मार्च १९१४ साली केली होती. या रेल्वे स्थानकाचं बांधकाम पूर्ण होण्यासाठी सुमारे नऊ वर्षं लागली. त्याची रचना जे.एच. हॉर्निमन याने केली होती. हे रेल्वे स्थानक बांधण्यासाठी सुमारे ७० लाख रुपये एवढी गुंतवणूक लागली होती. (Lucknow charbagh railway station)

ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा एजंट सी.एल. कॉल्विन याने इमारतीच्या बुरुजाच्या आत एका काचपेटीमध्ये त्या काळातलं नाणं आणि वर्तमानपत्र ठेवलं होतं. रेल्वे स्थानकाच्या इमारतीचं बांधकाम यशस्वीपणे पूर्ण झाल्याची आठवण म्हणून ती काचपेटी ठेवण्यात आली होती.

चारबाग रेल्वे स्थानकाच्या एक्झिट गेटवर एक जुनं रेल्वे इंजिन उभं आहे. हे इंजिन वाफेवर चालणाऱ्या गाडीचं आहे.

लखनऊ इथल्या चारबाग रेल्वे स्थानकाने भारतीय इतिहासातले काही संस्मरणीय भाग आहेत.

चारबाग रेल्वे स्थानकाचं आर्किटेक्चर

चारबाग रेल्वे स्थानक हे भारतातल्या सर्वात सुंदर रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. या स्थानकाची स्थापत्यशैली मुघल, राजपूत आणि अवधी यांसारख्या वेगवेगळ्या शैलींचं दर्शन घडवते. चारबाग रेल्वे स्थानकाबद्दल आणखी एक गंमतीशीर गोष्ट अशी आहे की, हे स्थानक वरून पाहिल्यास ते बुद्धिबळाच्या पटासारखं दिसतं.

रेल्वे स्थानकावर बांधलेले घुमट, खांब आणि बुरुज एका पटावर बुद्धिबळाच्या तुकड्यांसारखे दिसतात. या रेल्वे स्थानकाच्या खाली वेगवेगळे बोगदे आहेत. हे बोगदे माल वाहतुकीसाठी वापरले जातात. रेल्वे स्थानकाच्या पोर्चवर उभं राहिल्यास येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांचा आवाज ऐकू येत नाही असं म्हणतात. स्थानकाची मूळ रचना आयताकृती आकाराची आहे. तसंच इथं प्लॅटफॉर्म उंच आहेत. (Lucknow charbagh railway station)

चारबाग इथली लोकप्रिय पर्यटक स्थळं

लखनऊ हे अनेक पर्यटन केंद्र आहे. हे शहर उत्तर प्रदेश राज्यातल्या सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या शहरांपैकी एक आहे. चारबाग रेल्वे स्थानक एक्सप्लोर केल्यानंतर इथे आणखी काही ठिकाणं आहेत जिथे तुम्ही भेट देऊ शकता. जसे की..

  • अलीगंज इथली भगवान हनुमान मंदिरे
  • जैन मंदिर
  • सिकंदर बाग
  • राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था
  • दिलकुशा
  • गुरुद्वारा, याहियागंज
  • ला मार्टिनियर
  • बुद्ध मंदिर
  • शहीद स्मारक
  • विधान भवन
चारबाग येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ

चारबाग रेल्वे स्थानकाला वर्षभर भेट देता येते. पण तरीही लखनऊ शहरात सहलीचे नियोजन करण्यापूर्वी तुम्ही हवामान घटकाचा विचार करायला हवा. उन्हाळ्याच्या दिवसांत भारताच्या बहुतेक भागांप्रमाणेच उत्तर प्रदेशात वातावरण खूप गरम असू शकतं. या काळात इथलं सरासरी तापमान ४२℃ इतकं असतं. हिवाळ्याच्या दिवसांत इथलं हवामान थंड आणि आल्हाददायक असतं. त्यामुळे लखनऊ येथे सहलीची योजना आखण्याची हिवाळ्यात सर्वोत्तम वेळ असते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.