अमेठीमध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांक़डून धर्मांतराचा (Conversion) कट रचला जात होता. याठिकाणी ख्रिश्चिन मिशनऱ्यांनी गावातील भोळ्या लोकांना नोकरी, पैसे देण्याच्या बाहाण्याने धर्मांतरासाठी प्रोत्साहित केले. हे प्रकरण शुकुल बाजार ठाण्याच्या क्षेत्रात घडली. धर्मांतराला (Conversion)गावकऱ्यांनी विरोध केल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले. यानंतर या प्रकरणी पोलिसांना तक्रार करण्यात आली. पोलिसांनी तीन लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच काहींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशीही सुरु आहे.
( हेही वाचा : indian railway सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर घेणार; नेमकं कारण काय?)
अमेठी येथील शुकुल बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवाशी सतीश कुमार यांनी दि. १९ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी पत्र लिहत धर्मांतराची (Conversion) माहिती दिली. बाराबंकी जिल्ह्यातील हैदरगढ तहसील क्षेत्रातील रतौली मठ कुंडवा येथील प्रल्हादने आपल्या पत्नीसोबत गावातील सुर्यकलाच्या घरात गरीब महिलांचे धर्मांतर (Conversion)करण्याचा डाव रचला आहे. या धर्मांतराला गावकऱ्यांनी विरोध केल्यावर धर्मांतर (Conversion) करणाऱ्यांपैकी काही महिला आक्रमक झाल्या, असे कुमार यांनी पत्रात लिहले. तसेच त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
स्थानिक पोलिस ठाण्यातील दयाशंकर मिश्रा म्हणाले की, गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर तीन लोकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान काही लोकांना अटक करून त्यांची चौकशी सुरु आहे. आरोपींजवळ ख्रिश्चन धर्मांशी निगडीत प्रचार साम्रगी, पुस्तक, बँक पासबुक आणि चेक बुक जप्त करण्यात आले आहेत.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community