आदिवासी महिलेने PM Narendra Modi यांना १०० रुपये का पाठवले ? खुद्द मोदी यांनीच सांगितले कारण…

174
आदिवासी महिलेने PM Narendra Modi यांना १०० रुपये का पाठवले ? खुद्द पंतप्रधानांचीच सांगितले कारण
आदिवासी महिलेने PM Narendra Modi यांना १०० रुपये का पाठवले ? खुद्द पंतप्रधानांचीच सांगितले कारण

ओडिशातील एका आदिवासी महिलेच्या (Odisha Tribal Women) भावनिक प्रेमाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘स्त्री शक्ती’च्या (stri shkati) आशीर्वादाने त्यांना ‘विकसित भारत’साठी सतत काम करण्याची प्रेरणा दिली आहे. ओडिशातील सुंदरगढ जिल्ह्यात एका आदिवासी महिलेने भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत जय पांडा यांना १०० रुपये दिले आणि त्यांच्या कार्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले.   (PM Narendra Modi)

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करताना, भाजपा नेत्याने सांगितले की, शुक्रवारी (१८ ऑक्टोबर) पक्षाच्या सदस्यत्व मोहिमेदरम्यान एका आदिवासी महिलेने मला १०० रुपये दिले आणि विनंती केली की पंतप्रधान मोदींनी केलेल्या कामाबद्दल त्यांचं कौतुक करा. पैसे घेण्यासाठी मी वारंवार नकार देऊनही त्या आपल्या म्हणण्यावर ठाम राहिल्या. शेवटी हे पैसे मला घ्यावेच लागले” असं बैजयंत जय पांडा (Baijayant Jai Panda) यांनी म्हटलं आहे.

पीएम मोदींनी महिला शक्तीला सलाम करत

पुढे लिहिले, हे ओडिशा आणि भारतात होत असलेल्या बदलाचे प्रतीक आहे. यानंतर या पोस्टवर प्रतिक्रिया देताना पीएम मोदींनी लिहिले की, ‘या आपुलकीने मी खूप प्रभावित झालो आहे. यासाठी मी आमच्या स्त्री शक्तीला सलाम करतो, जी मला नेहमी आशीर्वाद देते. त्यांच्या आशीर्वादानेच मला विकसित भारतासाठी काम करण्याची प्रेरणा मिळते.  (PM Narendra Modi)

(हेही वाचा – indian railway सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर घेणार; नेमकं कारण काय?)

ओडिशा विधानसभेत भाजपाला ७८ जागा मिळाल्या

या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत, १४७ जागांच्या ओडिशा विधानसभेत भाजपाने ७८ जागा जिंकून नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बिजू जनता दल (BJD) ची २४ वर्षांची सत्ता संपवली. या निवडणुकीत बीजेडीला ५१ जागा मिळाल्या, तर काँग्रेसला फक्त १४ जागा मिळाल्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाने २१ पैकी २० जागा जिंकल्या, तर काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली आणि बीजेडीला एकही जागा जिंकता आली नाही. 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.