Dandiya Night मध्ये काय काय मज्जा येते?

70
Dandiya Night मध्ये काय काय मज्जा येते?
Dandiya Night मध्ये काय काय मज्जा येते?

नवरात्री हा भारतात विशेषत: गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये सर्वात जास्त साजरा केला जाणारा सण आहे. “नवरात्री” या शब्दाचा अर्थ “नऊ रात्र” असा होतो. नवरात्रीच्या दिवसांत लोक दुर्गा देवीच्या विविध नऊ रूपांची पूजा करतात. या सणाच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे गरबा आणि दांडिया हे पारंपरिक नृत्यप्रकार होय. देवीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी वेगवेगळे समुदाय एकत्र येतात. (Dandiya Night)

या पारंपारिक नृत्याची पाळंमुळं भारतीय पौराणिक कथांमध्ये खोलवर रुजलेली आहेत. हा नृत्यप्रकार दुर्गा देवीच्या सन्मानार्थ सादर केला जातो. दांडिया रास आणि गरबा रास हे केवळ नृत्य प्रकार नसून, देवी दुर्गा आणि दैत्य महिषासुर यांच्यातल्या युद्धाच्या प्रतिकात्मक हालचाली आहेत. गरबा आणि दांडियाच्या लय आणि गतिशील हालचाली उत्साह, भक्ती आणि दुर्गा देवीप्रति आदराचं वातावरण निर्माण करतात. त्यामुळे गरबा आणि दांडिया हे नृत्यप्रकार नवरात्रोत्सवाचा अविभाज्य भाग बनले आहेत. (Dandiya Night)

(हेही वाचा – Madh Island Resort: मुंबईतील मढ बेटाविषयी तुम्हाला माहिती आहे का?)

दांडिया आणि गरब्याचा उगम कसा झाला

गरबा आणि दांडियाचा इतिहास भगवान कृष्णाच्या काळात सापडतो. त्या काळापासून लोक हे नृत्यप्रकार आनंद आणि भक्तीभाव दर्शवण्यासाठी एक साधन म्हणून वापरायचे.

गरबा आणि दांडिया नृत्य हे गोल रिंगण करून केलं जातं. हे गोल रिंगण जीवनाचं शाश्वत चक्र दर्शवते. तसंच विश्वाच्या वैश्विक उर्जेचे प्रतिनिधित्वही करते. गरबा खेळताना हात आणि पायांच्या आकर्षक हालचाली केल्या जातात. तर दांडिया खेळताना दुर्गा देवीच्या तलवारींचं प्रतिक म्हणून सजवलेल्या काठ्यांचा वापर केला जातो. हे वाईट शक्तींविरुद्धच्या लढाईचं प्रतीक आहे.

हल्लीच्या काळात दांडिया आणि गरबा यांचं धार्मिक भावानेपेक्षा जास्त सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये रुपांतर झालं आहे. हल्ली वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक एकत्र आल्यामुळे गरबा आणि दांडियाची लोकप्रियता भारतभरच नव्हे तर परदेशातही पसरली आहे. पण तरीही या नृत्यांचं सार भक्ती आणि अध्यात्मातच आहे. गरबा आणि दांडिया हे नृत्य देवीचे आशीर्वाद मिळविण्यासाठी केलं जातं. तसंच हा दुर्गादेवीप्रति कृतज्ञता आणि भक्ती व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे.

दुर्दैवाने या नृत्याच्या आधुनिकीकरण आणि कार्यक्रमांच्या व्यापारीकरणामुळे, या सणाचं धार्मिक महत्त्व अनेकदा मनोरंजन मूल्याने तोललं जातं. गरबा आणि दांडिया हे नृत्यप्रकार मौजमजेसाठी आणि सामाजिक एकात्मिकता साधण्यासाठी महत्त्वाचा आहे. पण त्यांचा मुख्य उद्देश देवी दुर्गा, पराशक्ती आणि पराक्रमाचे प्रतीक आहे.

(हेही वाचा – Vidhansabha Election 2024 : मुंबईत यंदा किती आहेत नवीन मतदार ?)

दांडिया आणि गरबा मधला फरक कोणता?

दांडिया आणि गरबा हे परस्परांपेक्षा वेगळे नृत्य प्रकार आहेत. दांडिया हा रंगीबेरंगी सजवलेल्या काठ्यांच्या जोडीने खेळला जातो. हा नृत्यप्रकार दुर्गा देवीच्या तलवारीचे प्रतिनिधित्व करतो. या काठ्या दुर्गादेवीच्या महिषासुराशी झालेल्या युद्धाच्या वेळी तलवारींच्या चकमकीचा प्रतिध्वनी करणारे तालबद्ध ठोके तयार करतात. दांडिया खेळण्यासाठी जोडीने खेळणाऱ्या लोकांची आवश्यकता असते. (Dandiya Night)

तर गरबा खेळताना कोणत्याही गोष्टीची गरज भासत नाही. हात आणि पायांच्या विविध हालचाली करून गरबा नृत्य खेळलं जातं. हे नृत्य एकट्याने किंवा गटांमध्येही केलं जातं. गरबा नृत्य सहसा आरतीपूर्वी केलं जातं. या नृत्यामधून भाविकांची भक्ती आणि देवीप्रति असलेला आदर दिसून येतो.

नवरात्रीचा गाभा

नवरात्री हा केवळ एक सण नाही, तर हा एक सांस्कृतिक अनुभव आहे जो लोकांना दैवी ऊर्जा आणि आनंद साजरा करण्यासाठी एकत्र आणतो. गरब्याच्या तालावर फिरत असताना किंवा दांडियाच्या तालावर पावले थिरकत असताना, या सणाचं धार्मिक महत्त्व लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. दुर्गा देवीप्रति आपली भक्ती आणि प्रेम यांचं प्रतीक म्हणून गरबा आणि दांडिया हे नृत्यप्रकार खेळले जातात. नवरात्रीच्या या नऊ दिवसांत लोकांचं हृदय भक्ती, ऊर्जा आणि आनंदाने न्हाऊन निघतं. (Dandiya Night)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.