Ayodhya तील दीपोत्सवात आता घरबसल्या सहभागी व्हा; योगी सरकारची विशेष सेवा

166
Ayodhya तील दीपोत्सवात आता घरबसल्या सहभागी व्हा; योगी सरकारची विशेष सेवा
Ayodhya तील दीपोत्सवात आता घरबसल्या सहभागी व्हा; योगी सरकारची विशेष सेवा

अयोध्येत (Ayodhya) दरवर्षी भव्य दीपोत्सव शरयू नदीच्या काठावर आयोजित केला जातो. यावर्षी दि. ३० ऑक्टोबर रोजी हा भव्य असा दीपोत्सव होणार असून त्याची तयारी ही सुरु झाली आहे. शरयू नदीच्या काठावर यावर्षी २५ लाख दिवे लावून नवा विश्वविक्रम केला जाणार असल्याची माहिती वृत्तसंस्थांनी दिली आहे. (ayodhya deepotsav 2024)

( हेही वाचा : Karwa Chauth Wishes : करवा चौथच्या दिवशी द्या आपल्या माय मराठीत शुभेच्छा!

दरम्यान या दीपोत्सवासाठी जगभरातील रामभक्तांना घरबसल्या सहभागी होता येणार आहे, अशी माहिती योगी सरकारने दिली आहे. योगी सरकारच्या विकास प्राधिकरणाअंतर्गत दीपोत्सवासाठी ऑनलाईन पद्धतीने दिवे दान करून (Ayodhya) दीपोत्सवात सहभागी होता येणार आहे. तसेच शरयू नदी काठच्या या दीपोत्सवासाठी दिवे दान करणाऱ्यांना घरबसल्या प्रसाद सुद्धा मिळणार आहे. जो उत्तर प्रदेश राज्य ग्रामीण आजीविका मिशनद्वारे तयार केला जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीने दिवे दान करण्यासाठी आपण https://www.divyaayodhya.com/bookdiyaprashad या संकेतस्थळावर नोंदणी करू शकता.(ayodhya deepotsav 2024)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.