Dhobi Ghat कशासाठी प्रसिद्ध, कसे चालते व्यवस्थापन?

66
Dhobi Ghat कशासाठी प्रसिद्ध, कसे चालते व्यवस्थापन?
Dhobi Ghat कशासाठी प्रसिद्ध, कसे चालते व्यवस्थापन?

आशिया खंडातील सर्वात मोठा धोबीघाट (Dhobi Ghat)म्हणजे मुंबईच्या महालक्ष्मी येथील धोबीघाट आहे. . पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्द झालेल्या या धोबीघाटाला भारतीय आणि विदेशी पर्यटकही भेट देतात. येथून जवळच १९७७ मध्ये बांधलेले वरळीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान संग्रहालय नेहरू केंद्र, तसेच अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेले भायखळा येथील प्रसिद्ध जिजामाता उद्यान आणि प्राणी संग्रहालय आहे. (Dhobi Ghat)

धोबीघाटचा इतिहास

१८८० मध्ये भारतात ब्रिटिश राजवट होती. त्यावेळी ब्रिटिश, राजे-महाराजे, पोर्तुगीज, पारसी YA समाजाचे लोक प्रतिष्ठीत मानले जात असत. हे प्रतिष्ठीत पांढरे शुभ्र कपडे घालून समाजात वावरत असत. मात्र, त्यांचे हे पांढरे शुभ्र वस्त्र दिवसभरात लगेच मळत असत. त्यामुळे ब्रिटिशांनी १८९० मध्ये धोबीघाट बांधण्याच्या कामास सुरूवात केली. हा धोबीघाट (Dhobi Ghat)बांधून पूर्ण होण्यास पाच वर्ष लागली. बांधकाम करताना कपडे धुण्यासाठी ७३१ वॉश स्टोन आणि कपडे सुकवण्यासाठी जागा ठेवण्यात आली. १८९५ साली धोबीघाटचे काम पूर्ण झालं आणि ऐतिहासिक धोबीघाटाची (Dhobi Ghat)सुरूवात झाली. मुंबईत बांधलेल्या या पहिल्या धोबीघाटाची (Dhobi Ghat)उपयुक्तता, त्याचे अफाट यश याने प्रेरित होऊन इंग्रजांनी १९०२ साली कोलकाता येथे दुसरा धोबीघाट बांधला.

धोबीघाट हा दोन भागात विभागला गेला आहे. मोठा धोबीघाट (Dhobi Ghat)येथे ६३१ वॉश स्टोन तर लहान धोबीघाट मध्ये १०० वॉश स्टोन असून एकूण ७३१ वॉश स्टोन असलेला धोबीघाटचे नियोजन हे मुंबई महानगरपालिकेकडे आहे. त्यामुळे वॉश स्टोनसाठी प्रत्येक महिन्याला मुंबई महापालिकेला प्रत्येकी २९३ रूपये इतकं भाडं द्यावं लागतं. प्रत्येक वॉश स्टोन मालकाकडून ते वसूल केल जाते. वॉश स्टोन हस्तांतर करणे, धोबी घाटाची (Dhobi Ghat)दुरुस्ती, देखभाल आणि त्या लागणाऱ्या पाण्याचा पुरवठा महापालिकेमार्फत केला जातो. सद्यस्थितीत या व्यवसायात २ ते ३ हजार लोक काम करत आहेत. दिवसातील १४ ते १६ तास कपडे धुणे आणि सुकवण्याचं काम हे कामगार करत होते. पण, आता नवीन तंत्रज्ञानामुळे हे काम २४ तास सुरू असतं. मुंबई महापालिकेचे कर्मचारी पहाटे ४ ते ७ या वेळेमध्ये कपडे धुण्यासाठी लागणारे पाणी सोडतात. येथील धोबी पाण्याचा साठा करून ठेवतात. त्यांचे काम पूर्ण झाले की महापालिकेचे १६ ते १७ कर्मचारी संपूर्ण धोबीघाटाची साफसफाई करतात.

हेही पाहा : 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.