Classical Language : अभिजात मराठी भाषा आणि राजकीय भाषा!

122
Classical Language : अभिजात मराठी भाषा आणि राजकीय भाषा!
Classical Language : अभिजात मराठी भाषा आणि राजकीय भाषा!
जयेश शत्रुघ्न मेस्त्री

महाराष्ट्र युती सरकारच्या प्रयत्नाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. हे मराठी माणसासाठी अभिमानास्पद आहे. काही लोक मोदींना गुजराती म्हणून हिणवत होते, पण याच गुजरात्याने मराठीचा सन्मान केलेला आहे, हे मराठी माणसाने लक्षात ठेवले पाहिजे. महाराष्ट्र दिनाला हुतात्मा चौकात जाऊन महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आपण श्रद्धांजली वाहतो, पण ते हुतात्मे कोणामुळे झाले, याचा आपल्याला विसर पडतो. कॉंग्रेसने गोळ्या झाडून मराठी माणसाला मारुन टाकलंय. असो. मुद्दा असा की मराठी ही अभिजात भाषा झाली आहे. (Classical Language)

१३ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एका महत्त्वाच्या विषयाला हात घातला. राज्यातील नेत्यांच्या, विशेषतः सकाळ सकाळ आरवणाऱ्या प्रवक्त्यांच्या गलिच्छ भाषेबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. राज ठाकरे म्हणाले, ‘आज राज्यात नेत्यांची भाषा किती घसरली आहे? बोलणारे बोलतात कारण त्यांना माहीत आहे की आपण काहीही बोललो तरी त्याला प्रसिद्धी मिळणारच आहे. पण याने पुढच्या पिढ्यांच्या मनावर काय परिणाम होतील याचा विचार आपण कधी करणार आहोत का?’ काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांना मुलांच्या मनावर होणाऱ्या परिणामांची चिंता सतावत होती. लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा एनकाऊंटर पोलिसांनी केला होता व त्या पार्श्वभूमीवर काही उत्साही लोकांनी देवेंद्र फडणविसांचा (Devendra Fadnavis) बंदुकधारी फोटो झळकावला होता. म्हणून याचा लहान मुलांवर वाईट परिणाम होईल अशी चिंता सुप्रिया सुळे यांना सतावत होती.

(हेही वाचा – चित्तथरारक Air show द्वारे फ्रान्सच्या कलाकारांनी जिंकली पुणेकरांची मने)

पण सध्या महाराष्ट्रातले राजकीय नेते आणि प्रवक्ते ज्या प्रकारची भाषा वापरतात, त्याबद्दल त्यांना चिंता का वाटत नाही? कदाचित गलिच्छ भाषा वापरणारे सुप्रिया सुळे यांचेच सहकारी असावेत, म्हणून त्याकडे त्या दुर्लक्ष करीत असाव्या. मात्र राज ठाकरे यांनी व्यक्त केलेली चिंता खरोखर गंभीर आहे. मराठी भाषा ही आता अधिकृतपणे अभिजात भाषा झालेली आहे. म्हणजेच आपली मराठी ही प्राचीन आहे, ऐतिहासिक आहे, साहित्यिक दृष्टीने समृद्ध आहे, ती स्वतंत्र आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, त्या प्रमाणे ‘अमृतातही पैजा’ जिंकणारी आहे. अशी ही आपली माय मराठी आज इतर जागतिक भाषांच्या स्पर्धेत आपलं स्थान निर्माण करण्यास सज्ज झाली असताना आपले राजकीय नेते व सकाळी आरवणारे प्रवक्ते गलिच्छ शब्द वापरुन मराठीचा अपमान करीत आहेत. ते प्रवक्ते इतर नेत्यांना व महिलांना शिव्या देतात.

(हेही वाचा – BJP ने नवी मुंबईतील फूट वाचवली; ‘या’ आमदाराला पुन्हा दिली उमेदवारी)

लक्षात घ्या, शिव्या सर्वांनाच येतात, मात्र त्याचा वापर कुठे करायचा याचं भान सर्वांना असायला हवं. पण योग्यता नसतानाही मोठी पदे व पैसा मिळालेले हे नेते आपला हा समृद्ध वारसा पायदळी तुडवत आहेत. आता याविरुद्ध मराठी माणसानेच आंदोलन छेडायला हवे. गलिच्छ भाषा वापरुन मराठीचा अपमान करणाऱ्या नेत्यांवर बहिष्कार टाकायला हवा. त्यांच्या पक्ष प्रमुखांना लाखो पत्रे पाठवून अशा नेत्यांची हकालपट्टी करण्याचे आवाहन करायला हवे. तसे न केल्यास, निवडणुकीत त्या पक्षाला मते न देण्याचे व इतरांनीही मते देऊ नये, असे आवाहन करुन व्रत घेतले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले राजकीय नेते होते. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. शिवरायांच्या संस्कारातला नेता आपल्याला आज हवा आहे, शिवराळ औरंगजेबाच्या तालमीतला नेता नकोय! हे मराठी माणसाने ठामपणे सांगायला हवे.
माय मराठीला साष्टांग दंडवत!

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.