– नित्यानंद भिसे
शनिवारी, १२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते बाबा सिद्धिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्धिकी यांच्या हत्येनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. बाबा सिद्दीकी यांची हत्या (Baba Siddiqui Murder) राजकीय होती कि नाही, हे पोलीस तपासात उघड होईलच. पण या हत्येमुळे राजकीय नेत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सरकारनेही राजकीय नेत्यांच्या घराबाहेर पोलीस संरक्षण वाढवले आहे. तसेच महत्वाच्या व्यक्तींना दिले जात असलेल्या संरक्षणाचा फेरआढावा घेण्याचा निर्णयही घेतला आहे. बाबा सिद्धिकी यांची हत्या ही मागील नऊ महिन्यातील चौथी राजकीय हत्या आहे. मतभेद झाले कि थेट ठार करायचे, अशी धारणा राजकरणात वाढीस लागणे ही परिस्थिती अराजकतेचे संकेत देत आहे. (Baba Siddique)
वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्धिकी यांची गोळीबार करुन हत्या करण्यात आली. वाय दर्जाचे संरक्षण असूनही बाबा सिद्धिकी यांची हत्या करण्यात आली. बाबा सिद्धिकी यांना पंधरा दिवसांपूर्वी धमकीचे फोन आले होते. यानंतर निर्मलनगर खेरवाडीत त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. या दोघांपैकी एक हरियाणाचा आणि दुसरा उत्तर प्रदेशचा आहे. अजून दोन जणांचा शोध पोलीस घेत आहेत.
भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र मोरेंचा गोळ्या झाडून खून
7 फेब्रुवारी 2024 रोजी चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे (Mahendra More) यांच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केला. महेंद्र मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे हे त्यांच्या कार्यालयात बसले होते. त्याचवेळी पाच अज्ञात तरुण तोंडाला रुमाल बांधून हातात पिस्तूल घेऊन आले होते. कारमधून उतरताच ते महेंद्र मोरे यांच्या कार्यालयात घुसले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. ही घटना पूर्णपणे कॅमेऱ्यात कैद झाली नसली तरी आरोपी एका कारमधून कसे उतरतात, हातात बंदुका घेऊन कशा प्रकारे माजी नगरसेवकाच्या कार्यालयात शिरतात हे सर्व स्पष्टपणे सीसीटीव्हीत दिसत आहे. एका पाठोपाठ एक असे पाच जण हातात बंदुका घेऊन आले आणि थेट मोरे यांच्या कार्यालयात घुसले. मोरेंवर गोळीबार करताच आरोपींनी तेथून धूम ठोकली. या गोळीबारात महेंद्र मोरे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी ७ जणांवर गुन्हा दाखल केला.
उबाठाचे माजी नगरसेवक घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या
9 फेब्रुवारी 2024 रोजी फेसबुक लाईव्ह करत शिवसेना उबाठाचे अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा उर्फ ‘मॉरिस भाई’ (Morris Bhai) याने अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली नंतर आत्महत्या केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचा मुलगा अभिषेक घोसाळकर याची ९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही हत्या घोसाळकर यांचा मित्र मॉरिस नोरोन्हा याने केली. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यापूर्वी मॉरिस नोरोन्हा यांनी फेसबुक लाईव्ह केले होते. त्यामुळे ही हत्या कॅमेरात कैद झाली. हा व्हिडिओ लगेच व्हायरल झाला. यानंतर मॉरिस नोरोन्हा यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. अभिषेक घोसाळकर (४०) हे माजी नगरसेवक आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक होते. घोसाळकर यांचे 2013 पासून तेजस्वी दरेकर यांच्याशी लग्न झाले आहे. त्यांच्या राजकीय विकास कार्यामुळे ते समाजात लोकप्रिय होते. घोसाळकर हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे सदस्य माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र होते.
(हेही वाचा – BJP ने नवी मुंबईतील फूट वाचवली; ‘या’ आमदाराला पुन्हा दिली उमेदवारी)
अजित पवार गटाचे नगरसेवक सचिन कुर्मींची धारधार शस्त्राने हत्या
4 ऑक्टोबर 2024 रोजी भायखळ्यात जित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. कुर्मी यांची बुधवारी रात्री मुंबईतील भायखळा परिसरात हत्या करण्यात आली. भायखळा तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या गुह्यातील सर्व कागदपत्रे आणि आरोपीचा ताबा गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. पोलिसांनी तपास करून आनंदा काळे, विजय काकडे आणि प्रफुल पाटकरला ताब्यात घेऊन अटक केली. चौकशीत त्यांनी कुर्मी याची हत्या केल्याची कबुली दिली होती. कुर्मी याची हत्या ही पूर्ववैमनस्यातून झाली. हत्येनंतर ते तिघे पळून गेले होते. समीर कुर्मी हे समीर भुजबळ यांचे जवळचे कार्यकर्ते होते.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community