जेलमधून सुटलेल्या ‘भाईजान’ची काढली मिरवणूक!

आरोपीच्या जंगी स्वागतासाठी त्याच्या १० ते १५ साथीदारांनी बैंगन वाडी स्कायवॉक ब्रिज खाली, गोवंडी येथे खास मिरवणूक काढली.

135

शहाबुद्दीन मनवर अली इद्रीसी उर्फ बाबू चड्डी हा आरोपी जामिनावर सुटल्यावर त्याच्या दहा ते पंधरा साथीदारांनी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून अक्षरशः मिरवणूक काढली. त्यावेळी सर्व जण विना मास्क गर्दी करून होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यावर याची दखल घेत देवनार पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भर रस्त्यात हारतुरे आणि मिरवणूक!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २३ जून रोजी दुपारी ३ वाजता आरोपी शहाबुद्दीन मनवर अली इद्रीसी उर्फ बाबू चड्डी हा जामिनावर सुटला. त्यानिमित्ताने त्याचे जंगी स्वागत करण्यासाठी त्याच्या १० ते १५ साथीदारांनी बैंगन वाडी स्कायवॉक ब्रिज खाली, गोवंडी येथे खास मिरवणूक काढली. रस्त्यावरच हारतुरे घालून आरोपीला खांद्यावर बसवून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. या प्रकारामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली.

(हेही वाचा : कल्याणमध्ये भर रस्त्यात तरुणीला बेदम मारहाण)

जमावाकडून कोरोना नियमांचे उल्लंघन! 

दरम्यान सध्या मुंबईत कोरोना संसर्गामुळे  ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक निर्बंद्ध लागू केले आहेत. तसेच पोलिस आयुक्तांनीही जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. या आदेशाचेही यावेळी उल्लंघन करण्यात आले. तसेच जमावाने मास्क घातला नव्हता आणि गर्दी करून कोरोना नियमांचे उल्लंघन केले. या स्वागत मिरवणुकीचा व्हिडिओ व्हायरल झाला. तेव्हा या प्रकरणी अनिल कारंडे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली. याची दखल घेत देवनार पोलिसांनी कलम १८८, २६९, ३४ भादवि सह कोविड-१९ नियम ११ सह मपोका ३७(३), १३५ अंतर्गत २ जुलै रोजी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आली नाही.

टिटवाळ्यातही आरोपीची जंगी मिरवणूक! 

मोक्का अंतर्गत शिक्षा भोगणारा आरोपी जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याची जंगी मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणीही कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवण्यात आले. टिटवाळाजवळील वरप गावात या सर्व प्रकार घडला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कल्याणमधील टिटवाळाजवळील वरप गावात हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याणमध्ये एक मोक्कातंर्गत शिक्षा भोगणारा आरोपी जेलमधून सुटला. यावेळी त्या आरोपीच्या मित्रांनी त्याची जंगी मिरवणूक काढली. प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.