Cyclone: बंगालच्या उपसागरात ‘दाना’ चक्रीवादळ; ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार

280
Cyclone: बंगालच्या उपसागरात 'दाना' चक्रीवादळ; 'या' राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार
Cyclone: बंगालच्या उपसागरात 'दाना' चक्रीवादळ; 'या' राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार

बंगालच्या उपसागरात पुढच्या काही दिवसांत चक्रीवादळ (Cyclone) येण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रातही पुढच्या पाच दिवसांत काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम ओडिशा (Odisha) आणि पश्चिम बंगालच्या (West Bengal) किनारपट्टीला जाणवेल असेही हवामान खात्याने म्हटले आहे. (Cyclone)

चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता
पुढील २४ तासांत अंदमान समुद्रावरील हवेच्या चक्रीवादळाचे बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होण्याची शक्यता आहे. हवामान प्रणाली पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची तसेच २२ ऑक्टोबर सकाळपर्यंत तीव्र होण्याची, तर २३ ऑक्टोबरपर्यंत पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान प्रणाली पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने सरकून २२ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत गती तीव्र होईल आणि २३ ऑक्टोबरपर्यंत पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होईल. त्यानंतर, ते उत्तर पश्चिम दिशेने सरकून २४ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत ओडिशा-पश्चिम बंगाल किनारपट्टीपासून वायव्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची दाट शक्यता आहे. (Cyclone)

अतिवृष्टीची शक्यता
या पार्श्वभुमीवर मच्छिमारांना २१ ऑक्टोबरपर्यंत किनारपट्टीवर परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे. २३ ऑक्टोबरपासून ओडिशाच्या काही भागांत मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता असल्याची माहिती आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिली. किनारपट्टीवरील काही भागांत २४-२५ ऑक्टोबरला २० सें.मी. तर काही ठिकाणी ३० सें.मी. पाऊस, तर काही ठिकाणी ३० से.मी.पेक्षा जास्त पावसाची शक्यता असल्याचे ते म्हणाले. यामुळे पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. (Cyclone)

वाऱ्याचा वेग
२३ ऑक्टोबरच्या सायंकाळपासून ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर ताशी ४०-५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून तो ताशी ६० किमीपर्यंत पोहोचू शकतो. २४ ऑक्टोबरच्या रात्रीपासून ते २५ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत, ते हळूहळू १००-११० किमी प्रतितासपर्यंत वाढू शकते आणि १२० किमी प्रतितासपर्यंत पोहोचू शकते, असे आयएमडीने म्हटले आहे. (Cyclone)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.