Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, एका डॉक्टरसह सहा कामगारांचा मृत्यू; अमित शहांनी दिला गंभीर इशारा

133
Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, एका डॉक्टरसह सहा कामगारांचा मृत्यू; अमित शहांनी दिला गंभीर इशारा
Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, एका डॉक्टरसह सहा कामगारांचा मृत्यू; अमित शहांनी दिला गंभीर इशारा

गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) सातत्याने दहशतवाही हल्ल्याच्या (Terrorist Attack) घटना समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी दोन जवानाचं अपहरण केल्याची घटना घडली होती. यानंतर आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी गोळीबार करत सात जणांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात दहशतवाद्यांनी काही स्थलांतरित कामगारांवर रविवारी रात्री हल्ला केला. (Terrorist Attack)

या हल्ल्यात (Terrorist Attack)सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच या हल्ल्यात अनेकजण गंभीर जखमी झाले असल्याचीही माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी प्रतिक्रिया देत या हल्ल्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही, कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल, असा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे.

अमित शाह काय म्हणाले?
“जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गंगानगीरमध्ये नागरिकांवर झालेला दहशतवादी हल्ला हे भ्याड आणि घृणास्पद कृत्य आहे. या घृणास्पद कृत्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही आणि त्यांना आमच्या सुरक्षा दलांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. या दुःखाच्या प्रसंगी मी मृतांच्या कुटुंबियांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.” असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. (Terrorist Attack)

नेमकं काय घडलं?
गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर सोनमर्गला जोडणाऱ्या झेड-मोर बोगद्यावर काही कामगार काम करत होते. मात्र, हे काम करत असतानाच अचानक दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात काम करणाऱ्या सात जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात एक डॉक्टर आणि सहा स्थलांतरित कामगारांचा मृत्यू झाला आहे. यानंतर भारतीय जवानांनी घटनास्थळी दाखल होत दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. (Terrorist Attack)

ओमर अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया
दरम्यान, काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक व्ही के बिर्डी यांच्यासह वरिष्ठ सुरक्षा अधिकारी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी म्हटलं की, “गगनगीर येथे मजुरांवर झालेल्या भयंकर आणि भ्याड हल्ल्याची अत्यंत दु:खद बातमी. हे लोक या भागातील एका महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पावर काम करत होते. मी नि:शस्त्र निष्पाप लोकांवर झालेल्या या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो,” असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. (Terrorist Attack)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.