’५० खोके एकदम ओके’ ही घोषणा गुन्हा नाही; Mumbai High Court ने फटकारले

179
’५० खोके एकदम ओके’ ही घोषणा गुन्हा नाही; Mumbai High Court ने फटकारले
’५० खोके एकदम ओके’ ही घोषणा गुन्हा नाही; Mumbai High Court ने फटकारले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बंडानंतर उबाठा गटाने ’५० खोके एकदम ओके’ (50 khoke ekdum okay slogan) ही घोषणा डिवचण्यासाठी दिली. या घोषणेविरोधात न्यायालयात (Mumbai High Court) एक याचिकाही दाखल केली होती, त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला आहे. ‘50 खोके एकदम ओके’ अशा घोषणा देत शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर आंदोलन करणाऱ्या वकिलाविरोधात नोंदवलेला गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला. ’50 खोके एकदम ओके’ ही घोषणा गुन्हा नाही असे न्यायलयाने नमूद केले. सरकारने अपेक्षा भंग केल्यास उद्रेक तर होणारच असे म्हणत न्यायालयाने फटकारलेही. तसेच याबाबतचा एफआयआरही रद्द करण्यात आला आहे. (Mumbai High Court)

नेमकं प्रकरण काय?
आमदार अब्दुल सत्तार हे गेल्या वर्षी मार्च महिन्यात जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी ॲडव्होकेट. शरद माळी तसेच त्यांच्यासह अन्य उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी मंत्री सत्तार यांच्या वाहनांच्या ताफ्यावर कापूस तसेच रिकामे खोके फेकले होते. तसेच ‘50 खोके एकदम ओके’ अशा जोरदार घोषणाही देण्यात आल्या. याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र आपल्याला नाहक त्रास देण्यासाठी हा गुन्हा नोंदवण्यात आल्याचा दावा करत ॲडव्होकेट. माळी यांनी हायकोर्टात याचिका दाखल करत हा गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी केली होती. (Mumbai High Court)

(हेही वाचा-Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, एका डॉक्टरसह सहा कामगारांचा मृत्यू; अमित शहांनी दिला गंभीर इशारा)

अखेर या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली असता ’50 खोके एकदम ओके’ ही घोषणा गुन्हा नाही, असे न्यायालयाने नमूद केले. तसेच आंदोलकांनी मंत्री सत्तार यांच्या वाहनांचा ताफा अडवला व मंत्री यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले, असा तपशील नोंदवलेल्या गुह्यात नाही. त्यामुळे आंदोलकांवरील हा आरोप मान्य करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. (Mumbai High Court)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.