ISIS चा क्रूर चेहरा पुन्हा जगासमोर; अपहरण केलेल्यांना खायला लावले स्वतःच्याच मुलांचे मांस

210
ISIS चा क्रूर चेहरा पुन्हा जगासमोर; अपहरण केलेल्यांना खायला लावले स्वतःच्याच मुलांचे मांस
ISIS चा क्रूर चेहरा पुन्हा जगासमोर; अपहरण केलेल्यांना खायला लावले स्वतःच्याच मुलांचे मांस

इस्रायलने (Israel) हमासचा खात्मा करण्यासाठी वर्षभराहून अधिक काळापासून गाझापट्टीवर हल्ले केले आहेत. नुकतेच इस्रायलच्या सैन्याने गाझामधून याझिदी समुदायाच्या फौझिया अमीन सिडो या मुलीची सुटका केली होती. सुटकेच्या दोन आठवड्यानंतर आता या मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याचारांना वाचा फोडली आहे. फौझिया सिडोने ‘जेरुसलेम पोस्ट’शी बोलतांना इसिसचे (ISIS) क्रौर्य जगासमोर आणले आहे.

(हेही वाचा – Mumbai University च्या नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; ‘हे’ आहे कारण)

अवघ्या दहा वर्षांची असताना सिडो आणि तिच्या भावाचे अपहरण करण्यात आले होते. तीन दिवस उपाशीपोटी पायपीट केल्यानंतर अपहरण केलेल्या जमावाला इसिसच्या अतिरेक्यांनी खायला अन्न दिले. यामध्ये भात आणि मांसाचा समावेश होता. सिडो म्हणाली, त्यांनी आम्हाला भात आणि मांस खायला दिले होते. पण त्याची चव विचित्र वाटत होती. आमच्यातील काही जणांना नंतर पोटदुखी सुरू झाली, तर काहींनी उलट्या केल्या. जेव्हा आमचे जेवून झाले, तेव्हा अतिरेक्यांनीच सांगितले की, ते मांस याझिदी समुदायातील मुलाचे होते. त्यांनी आम्हाला शिरच्छेद केलेल्या मुलांचे फोटोही दाखवले आणि सांगितले की, या मुलांना तुम्ही आताच खाल्ले.

हे ऐकून आमच्यातल्या एका महिलेला हृदयविकाराचा झटका आला आणि ती तिथेच मरण पावली. तसेच एका महिलेने त्या फोटोंमधून स्वतःच्या मुलाला ओळखले आणि हंबरडा फोडला. इसिसच्या अतिरेक्यांनी आमच्यावर खूप दबाव टाकला होता. त्यामुळे आम्हाला काही सुचत नव्हतं. आमच्या हाती काहीच नव्हतं.

२०१४ साली इस्लामिक स्टेट अर्थात इसिसनं इराकमधील आणि सीरियामधील याझिदींविरुद्ध क्रूर मोहीम सुरू केली. अनेक मुली आणि महिलांना त्यांनी गुलाम बनवलं. प्राचीन यझिदी समुदाय अल्पसंख्याक असून इसिसने त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले.

फौझिया सिडोबरोबर (Fawzia Amin Sido) आणखी २०० याझिदी महिला आणि मुलं होती. काही मुलं पाण्याच्या कमतरतेमुळं तिथेच मरण पावली. सिडोला आतापर्यंत अनेकदा जिहादी अतिरेक्यांना विकण्यात आलं. त्यापैकीच एक अबू अमर अल-मकदीसी आहे, ज्याच्यापासून सिडोला दोन मुलं झाली. ११ वर्ष कैदेत राहिल्यानंतर इस्रायल, अमेरिका आणि इराक यांचा समावेश असलेल्या संयुक्त मोहिमेद्वारे सिडोची सुटका करण्यात आली. आता ती इराकमध्ये तिच्या कुटुंबियांबरोबर आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.