-
ऋजुता लुकतुके
न्यूझीलंडची ३७ वर्षीय स्टार खेळाडू सुझी बेट्सने (Susie Bates) किवी संघाला टी-२० विजेतेपद तर मिळवून दिलंच. पण, त्याचबरोबर महिला क्रिकेटमधील एक मानाचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अंतिम सामना हा तिचा ३३४ वा आंतरराष्ट्रीय सामना होता. तो खेळतानाच तिने भारताच्या मिताली राजला मागे टाकलं आहे. मागची १८ वर्षं बेट्स किवी संघातून खेळत आहे. २००६ पासून सुझीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरूवात केली होती. (Women’s T20 World Cup)
(हेही वाचा- ISIS चा क्रूर चेहरा पुन्हा जगासमोर; अपहरण केलेल्यांना खायला लावले स्वतःच्याच मुलांचे मांस)
मागची काही वर्षं हा विक्रम भारताच्या मिताली राजच्या नावावर होता. २०२२ च्या टी-२० विश्वचषकानंतर मिताली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाली. तोपर्यंत ती ३३३ आंतरराष्ट्रीय सामने खेळली होती. सुझी बेट्सने १६३ एकदिवसीय सामन्यांत ६,७१८ धावा केल्या आहेत. यात तब्बल १३ शतकं तर ३४ अर्धशतकं आहेत. टी-२० प्रकारात न्यूझीलंडकडून ती १७१ सामने खेळली आहे. ४,००० च्या वर धावा तिच्या नावावर आहेत. महिला किंवा पुरुषांच्या क्रिकेटमध्येही ४,००० टी-२० धावा करणारी ही पहिली खेळाडू आहे. (Women’s T20 World Cup)
Suzie Bates became the most capped women’s international cricketer today.
Remarkably also played in the Olympics, in basketball in 2008.#T20WomensWorldCup pic.twitter.com/PDclFEwf8b
— Kausthub Gudipati (@kaustats) October 20, 2024
मोठ्या कारकीर्दीच्या बाबतीत टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि बाबर आझम (Babar Azam) यांचं वर्चस्व राहिलं आहे. पण, या तिघांच्याही आधी सुझीने ४,००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. (Women’s T20 World Cup)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community