Pune Metro Fire : पुण्यातील मंडई मेट्रो स्थानकाला भीषण आग; जीवितहानी नाही

119
Pune Metro Fire : पुण्यातील मंडई मेट्रो स्थानकाला भीषण आग; जीवितहानी नाही
Pune Metro Fire : पुण्यातील मंडई मेट्रो स्थानकाला भीषण आग; जीवितहानी नाही

महात्मा फुले मंडई परिसरातील मेट्रो स्थानकात रविवार, २० ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12 च्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती मिळतात अग्निशामक दलाचे पाच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. मंडई मेट्रो स्टेशन येथे तळमजल्यावर फोमच्या साहित्याला आग लागून मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. अग्निशमन दलाकडून तातडीने 5 वाहने रवाना करत आग पाचच मिनिटात आटोक्यात आणली. जवानांनी श्वसनरहित अग्निशमन उपकरणाचा वापर करत पाणी मारून आग विझवली. जखमी कोणी नसून आग वेल्डिंगचे काम सुरु असताना लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (Pune Metro Fire)

(हेही वाचा – ISIS चा क्रूर चेहरा पुन्हा जगासमोर; अपहरण केलेल्यांना खायला लावले स्वतःच्याच मुलांचे मांस)

26 सप्टेंबर रोजी या मेट्रोस्थानकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले होते. मेट्रो स्थानकाचे मोठे नुकसान झाले असले, तरी रात्री आग लागल्याने प्रवाशांची वर्दळ नव्हती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. याविषयी मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही ट्वीट करून माहिती दिली आहे.

मंडई मेट्रो स्टेशनला आग लागल्याचा दुर्दैवी प्रकार घडला होता. आगीची बातमी समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच फायर गाड्यांच्या माध्यमातून आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सदरील घटना मेट्रोचे प्रवासी कामकाज संपल्यानंतर घडली होती. मेट्रो स्टेशनच्या भागात वेल्डिंगची काम सुरू असताना हा प्रकार घडला. यासंदर्भात मेट्रोचे कार्यकारी संचालकश्रवण हर्डीकर यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली असून या घटनेचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे मेट्रो प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे, असे ट्वीट मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. (Pune Metro Fire)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.