Maharashtra Vidhansabha Election 2024: मोठी बातमी! महायुती आणि मनसे एकत्र येणार? मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली चर्चा

249
Maharashtra Vidhansabha Election 2024: मोठी बातमी! महायुती आणि मनसे एकत्र येणार? मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली चर्चा
Maharashtra Vidhansabha Election 2024: मोठी बातमी! महायुती आणि मनसे एकत्र येणार? मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली चर्चा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Vidhansabha Elections 2024) बिगुल वाजले आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना राज्यात रंगणार असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची गुप्त बैठक झाली आहे. या बैठकीतील तपशील समोर आले आहेत. (Maharashtra Vidhansabha Elections 2024)

(हेही वाचा-Assembly Election : महायुतीचे जागावाटप जवळपास स्पष्ट; मात्र मविआचा तिढा काही सुटेना)

काही निवडक जागांवर महायुती राज ठाकरेंना पाठिंबा देणार असल्याचं कळतं आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे यांनी महायुतीला आपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र आता विधानसभेला त्यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. अशावेळी फडणवीस, शिंदे, राज ठाकरे यांच्यात झालेली बैठक महत्वाची ठरत आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची बैठक झाली. या बैठकीत शिवडी, वरळी, माहीमसह काही जागांवर महायुती राज ठाकरेंना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. (Maharashtra Vidhansabha Elections 2024)

(हेही वाचा-Bomb Threats in Flights : भारतीय विमान बॉम्बने उडवण्याची खलिस्तानी दहशतवाद्याची धमकी)

शनिवारी (१९ ऑक्टो.) रात्री 12 वाजता देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे हे नागपुरातून मुंबईत आले. रात्री 12 वाजता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा मुंबई विमानतळावरून निघाला. या दोनही नेत्यांच्या वाहनांचा ताफा हा वरळीपर्यंत आला. नंतर हा ताफा अज्ञातस्थळी गेला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील ठाण्याहून मुंबईच्या दिशेने निघाले होते. राज ठाकरेंसोबत झालेल्या गुप्त बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस पहाटे तीन वाजता सागर बंगल्यावर गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील तीन वाजता वर्षा बंगल्यावर पोहोचले. अशी माहिती मिळत आहे. (Maharashtra Vidhansabha Elections 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.