Gadchiroli मध्ये पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक; तीन ते चार माओवादी ठार! धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ

82
Gadchiroli मध्ये पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक; तीन ते चार माओवादी ठार! धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ
Gadchiroli मध्ये पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक; तीन ते चार माओवादी ठार! धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ

गडचिरोलीतील (Gadchiroli) सीमावर्ती भागात नक्षलविरोधी पोलीस पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये (Naxalite) चकमक सुरू आहे. या चकमकीत तीन ते चार नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर एक पोलीस जवान जखमी झाल्याचीही माहिती आहे. भामरागडमधील कोपरीच्या जंगलात ही चकमक झाली आहे. (Gadchiroli)

या भागात अनेक नक्षलवादी असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या भागात कारवाई केली. या चकमकीत तीन ते चार नक्षलवादी ठार झाले आहेत. गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कोपरी हा शेवटचा जंगल परिसर आहे. या जंगलात ऑपरेशन राबविण्यात आलं आहे. सी. सिक्सटी पोलीस पथकाचे तुकड्या वाढवण्यात येत आहेत. (Gadchiroli)

धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. धर्माराव आत्राम आज भामरागड दौऱ्यावर आहेत. अशातच भामरागड तालुक्यात चकमक घडल्यामुळे आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी कॅबिनेट मंत्री आत्राम हे भामरागड तालुक्याला सकाळी गेले. त्यानंतर ते आता गडचिरोलीत विविध ठिकाणी प्रचारासाठी फिरणार आहेत. अशातच पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. त्यामुळे आत्राम यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. (Gadchiroli)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.