Ind vs NZ, 2nd Test : भारताच्या आक्रमक क्रिकेटची कर्णधार रोहितने केली पाठराखण

Ind vs NZ, 2nd Test : ‘पिछाडीवर असलो तरी आक्रमक क्रिकेटच खेळत राहणार’ 

64
Ind vs NZ, 2nd Test : भारताच्या आक्रमक क्रिकेटची कर्णधार रोहितने केली पाठराखण 
Ind vs NZ, 2nd Test : भारताच्या आक्रमक क्रिकेटची कर्णधार रोहितने केली पाठराखण 
  • ऋजुता लुकतुके 

न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या बंगळुरू कसोटीत भारतीय संघाचा ८ गडी राखून पराभव झाला आहे. त्यामुळे मालिकेतही भारतीय संघ ०-१ ने पिछाडीवर आहे. पहिल्या डावात ४६ धावांमध्ये सर्वबाद होण्याची नामुष्की संघावर ओढवली. किवी संघाने मात्र पहिल्या डावात ४०२ धावा केल्या. दुसऱ्या डावात भारताने प्रतिकार करत ४६२ धावा केल्या असल्या तरी न्यूझीलंडसमोर भारतीय संघ जेमतेम १०२ धावांचंच आव्हान उभं करू शकला. ते आरामात पार करत न्यूझीलंडने विजय मिळवला. दुसऱ्या डावात सर्फराझ (Sarfraz) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) खेळत असताना भारतीय संघ ३ बाद ४०८ वर होता. पण, उर्वरित ७ गडी ५७ धावांतच गुंडाळले गेले आणि तिथे भारतीय संघाचा घात झाला. पहिल्या डावात ४५ धावांत ४६ बळी आणि दुसऱ्या डावात ५४ धावांत ७ गडी यामुळे भारतीय संघाचं गणित बदलून गेलं. काही फलंदाजांवर खेळपट्टीवर टिकून न राहण्याचा शिक्का बसला तो वेगळाच. (Ind vs NZ, 2nd Test)

(हेही वाचा- Maharashtra Vidhansabha Election 2024: मोठी बातमी! महायुती आणि मनसे एकत्र येणार? मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली चर्चा)

असं असलं आणि मालिकेत पिछाडीवर पडले असले तरी भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आक्रमक क्रिकेट सोडणार नाही, अशीच भूमिका घेतली आहे. ‘फक्त एका सामन्यानंतर आम्ही आमची मानसिकता बदलणार नाही. आधी खेळत होतो तसेच खेळत राहणार,’ असं रोहित ठामपणे म्हणाला. (Ind vs NZ, 2nd Test)

‘प्रयत्न करणं आणि तुम्ही दडपणाखाली आहात असं प्रतिस्पर्धी संघाला भासवू न देणं हा आम्‌चा ब्रँड आहे. आम्ही मागे असू तेव्हा आम्ही काहीतरी वेगळं आणि अविश्वसनीय करण्याचा प्रयत्न करतो. भीती बाळगून खेळण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत छान क्रिकेट खेळण्यावर आमचा भर आहे. आमच्या आधीच्या कसोटी पाहिल्यात तर आम्हाला काय म्हणायचंय तुम्हाला कळेल,’ असं रोहित सामना संपल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाला. (Ind vs NZ, 2nd Test)

(हेही वाचा- Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद्यांनी रेकी करून कामगारांना केले लक्ष्य)

अर्थात प्रतिस्पर्धी खेळाडूही भारतात खेळण्याची तयारी करून येताना दिसतात हे रोहितने मान्य केलं. त्याचा निशाणा रचिन रविंद्रवर होता. ‘रचिन खेळलेले काही फटके केवळ अप्रतिम होते. तो नैसर्गिक खेळ करत होता. फिरकीपटूंना तो खूप चांगलं खेळला. या आधी इंग्लंडच्या फलंदाजांनीही स्विप फटक्याचा वापर करून आम्हाला मालिकेत जेरीला आणलं होतं. अशा धक्क्यांसाठी आम्ही तयार राहणं आवश्यक आहे,’ असंही रोहित म्हणाला. (Ind vs NZ, 2nd Test)

पण, या कसोटीतून शिकायचे धडे भारतीय संघ शिकला आहे. नवीन कसोटीसाठी तयार आहे, असंच रोहीतला शेवटची सुचवायचं होतं.  (Ind vs NZ, 2nd Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.