Reliance-Hotstar Merger : रिलायन्स-हॉटस्टार विलीनीकरणानंतर जिओ सिनेमा बंद होणार?

Reliance-Hotstar Merger : सध्या भारतीय संघाच्या सामन्यांचे प्रसारणाचे हक्क हे जिओ सिनेमाकडे आहेत.

160
Reliance-Hotstar Merger : रिलायन्स-हॉटस्टार विलीनीकरणानंतर जिओ सिनेमा बंद होणार?
  • ऋजुता लुकतुके

रिलायन्स आणि डिस्नी हॉटस्टार समुहाच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खासकरून क्रीडा विषयक कार्यक्रम आणि लाईव्हचं स्वरुप पूर्णपणे बदलणार आहे. आतापर्यंत रिलायन्स समुहाकडे भारताच्या सामन्यांचे प्रसारणाचे हक्क होते. आणि आयसीसी स्पर्धांचे प्रसारणाचे हक्क हे हॉटस्टारकडे होते. पण, आता याच दोन कंपन्या एकमेकांत विलीन झाल्यावर दोन्ही वाहिन्या आणि ओटीटीवर काय कार्यक्रम जाणार याची पुनर्रचना करण्यात येणार आहे. यात क्रिकेट तसंच क्रीडाविषयक सर्व कार्यक्रम हे स्टार स्पोर्ट्स वाहिन्या आणि हॉटस्टारवर दाखवल्या जातील. त्यामुळेच जिओ सिनेमा बंद होणार की काय अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. (Reliance-Hotstar Merger)

(हेही वाचा – Mohammed Shami : मोहम्मद शमीची नेट्समध्ये गोलंदाजी, व्हीडिओ व्हायरल)

रिलायन्स समुहाच्या या निर्णयाबाबत टाईम्स समुहाने एक सविस्तर बातमी केली आहे. त्यानुसार, स्टार इंडिया आणि वियकॉम १८ या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर डिस्नी हॉटस्टार हा एकमेव स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म असेल. रिलायन्स समुहाला दोन स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म चालवायचे नाहीत. जिओ सिनेमा हॉटस्टारमध्येच विलीन केला जाईल. स्ट्रिमिंगचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी रिलायन्स समुहाने वेगवेगळे पर्याय शोधले होते. सुरुवातीला दोन्ही स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्स स्वतंत्रपणे चालवण्याचा कंपनीचा विचार होता. डिस्नी हॉटस्टार आणि जिओ सिनेमा या दोन्ही स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्समधील एक मंच क्रीडा तर दुसरा प्लॅटफॉर्म हा मनोरंजनासाठी काम करेल, असं सूत्र अवलंबण्याचाही रिलायन्स इंडस्ट्रिजचा विचार होता. मात्र हॉटस्टारकडे प्रगत तंत्रज्ज्ञान आहे. त्यामुळे रिलायन्स समुहाकडून याच प्लॅटफॉर्मला कायम ठेवले जाईल आणि जिओ सिनेमाचे विलीनकरण होऊ होईल. (Reliance-Hotstar Merger)

(हेही वाचा – ICC Test Championship : भारताच्या पराभवाने आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धा क्रमवारीवर काय झालाय परिणाम?)

याआधीही रिलायन्स समुहाने याच प्रकारचं धोरण स्पष्ट केलं होतं. दोन ओटीटी वाहिन्या चालवण्यात त्यांना रस नसल्याचंच रिलायन्सने बोलून दाखवलं होतं. यात हॉटस्टारला जिओ सिनेमापेक्षा जास्त प्रेक्षक किंवा सबस्क्राईबर आहेत. हॉटस्टर ॲप साधारणपणे ५० कोटी लोक वापरतात. तर जिओ सिनेमाचं ॲप १० कोटी लोक पाहतात. या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात रिलायन्स आणि डिस्नी हॉटस्टार यांच्यात स्टार आणि वायकॉम १८ च्या विलीनीकरणाचा करार झाला होता. हा करार साधारण ८.५ अब्ज डॉलरमध्ये झाला होता. दरम्यान, रिलायन्स समुहाच्या वार्षिक अहवालानुसार जिओ सिनेमाच्या मासिक सबस्क्राईबरची संख्या २२.५ कोटी आहे. तर डिस्नी हॉटस्टारचे साधारण ३३.३ कोटी मासिक वापरकर्ते आहेत. डिस्नी हॉटस्टार साठी वार्षिक शुल्क भरणारे लोक आहेत ३.५ कोटी आणि इंग्लिश प्रिमिअर लीगच्या वेळी हा आकडा ६ कोटींच्या वर गेला होता. (Reliance-Hotstar Merger)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.