विधानसभेच्या ‘या’ 12 जागांवरून Congress आणि उबाठा गटात आहे वाद?

लोकसभा निवडणुकीच्या वेळी उबाठाने रामटेक आणि अमरावती या दोन जागा काँग्रेसला (Congress) दिल्या होत्या, त्यामुळे आता त्यांच्या बदल्यात उबाठाला कॉँग्रेसकडून विधानसभेच्या जास्त जागा हव्या आहेत.

196
Bandra East Constituency : ‘मातोश्री’च्या अंगणात सांगली पॅटर्न’?
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जागा वाटप करण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. त्यातच भाजपाने 99 उमेदवारांची यादी जाहीर करून बाजी मारली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाने एबी फॉर्म वाटण्यास सुरुवात केली असल्याची चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाची यादी येत्या दोन दिवसांत जाहीर होईल. दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीतील कॉँग्रेस (Congress) आणि उबाठा या दोन्ही पक्षांमध्ये विदर्भातील 12 जागांवरून मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता बळावली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी उबाठाने रामटेक आणि अमरावती या दोन जागा काँग्रेसला (Congress) दिल्या होत्या, त्यामुळे आता त्यांच्या बदल्यात उबाठाला कॉँग्रेसकडून विधानसभेच्या जास्त जागा हव्या आहेत. त्यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने (Shivsena UBT) 12 जागांवर दावा केला आहे. त्या जागांवर महाविकास आघाडीचा एकही विद्यमान आमदार नसल्यामुळे या 12 जागा मागितल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. त्यामुळे काँग्रेसने (Congress)  मोठ्या मनाने या जागा उबाठाला द्याव्यात, असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे.

विदर्भातील कोणत्या 12 जागांवर वाद? 

  • आरमोरी विधानसभा मतदारसंघ – कृष्णा गजबे (भाजप आमदार)
  • गडचिरोली- देवरल होळी (भाजप आमदार)
  • गोंदिया- विनोद अग्रवाल (अपक्ष आमदार)
  • भंडारा- नरेंद्र भोंडेकर (अपक्ष आमदार)
  • चिमूर- कीर्ती कुमार (भाजप आमदार)
  • बल्लारपूर- सुधीर मुनगंटीवार (भाजप आमदार)
  • चंद्रपूर- किशोर जोरगेवार (अपक्ष आमदार)
  • रामटेक- आशिष जैस्वाल (अपक्ष आमदार, शिंदे गटाचा पाठिंबा)
  • कामाठीपुरा – टेकचंद सावरकर (भाजप आमदार)
  • दक्षिण नागपूर – मोहन मते (भाजप आमदार)
  • अहेरी- धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादीचे आमदार)
  • भद्रावती वरोरा – प्रतिभा धानोरकर (काँग्रेस आमदार पण सध्या लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले आहेत)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.