Sandeep Naik घेणार हाती ‘तुतारी’; वडील गणेश नाईक म्हणाले, प्रचाराला…

224
Sandeep Naik घेणार हाती 'तुतारी'; वडील गणेश नाईक म्हणाले, प्रचाराला...
Sandeep Naik घेणार हाती 'तुतारी'; वडील गणेश नाईक म्हणाले, प्रचाराला...

बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहिर झाली. त्यानंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी तातडीने समर्थकांची बैठक घेत ‘निवडणुक लढविणारच’ अशी भुमिका जाहिर केली. यावेळी त्यांनी काही समर्थकांसह पक्षाच्या पदांचा राजीनामा देण्याचा इशारा दिला.

(हेही वाचा : MNS : मनसेकडून ठाणे आणि कल्याणमधील उमेदवारी जाहिर

मात्र दुसरीकडे संदीप नाईक (Sandeep Naik) यांचे वडील गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी संदीप नाईक यांच्या भुमिकेबाबत मत व्यक्त केले आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईक यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. त्याचवेळी संदीप नाईक (Sandeep Naik)बेलापूर विधानसभेसाठी आग्रही असल्याने(Ganesh Naik) नाईक म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे. या पक्षात तुम्ही तुमच्या भुमिका मांडू शकता, आग्रह धरू शकता. मात्र संदीप नाईकांना मी बोललो पक्षाच्या शिस्तीच्या चौकटीत रहावं. यापुढे संदीप नाईक काय निर्णय घेतली हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र निवडणुक लढवल्यास मी त्यांच्या प्रचाराला जाणार नाही, अशी भुमिका गणेश नाईक यांनी घेतलीय.

त्यात दि. २१ ऑक्टोबर रोजी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप नाईक (Sandeep Naik)हे दि. २२ ऑक्टोबरला राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. मात्र पक्षप्रवेशाआधी गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी संदीप नाईकांना (Sandeep Naik)भावनिक साद घातल्यास चित्र वेगळे असेल.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.