Assembly Election साठी तिसऱ्या आघाडीसह वंचितचीही यादी जाहीर; मविआला बसणार फटका?

175
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) महाविकास आघाडी आणि महायुतीतील तीन-तीन पक्षांसह तिसऱ्या आघाडीतील तीन पक्षही रिंगणात असणार आहेत. या शिवाय वंचित बहुजन आघाडी आणि महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष हे स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. दुसरीकडे एमआयएम, बहुजन समाज पक्ष हेही स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत एका-एका जागेवर अनेक उमेदवार असणार आहे, ज्यामुळे अनेक ठिकाणी काटे कि टक्कर होणार आहे. त्यातच तिसऱ्या आघाडीची पहिली आणि वंचितची पाचवी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या उमेदवारांमुळे मविआच्या उमेदवारांची विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) मते घटण्याची दाट शक्यता आहे.
तिसरी आघाडी परिवर्तन महाशक्तीने पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत आमदार बच्चू कडू यांच्या नावाचाही समावेश आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) तिसरी आघाडी सुरू करण्यात आली आहे. माजी खासदार राजू शेट्टी , माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार बच्चू कडू यांनी एकत्र येत परिवर्तन महाशक्तीची स्थापना केली आहे. तिसरी आघाडी राज्यात २८८ जागा लढवणार असून सोमवारी पहिली यादी जाहीर केली आहे. अचलपूर, रावेर, ऐरोली, चांदवड, देगलूर, हिंगोली या जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
या यादीत शिरोळ आणि मिरज या जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आल्या आहेत. पण या यादीत उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली नाही, माजी खासदार राजू शेट्टी त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन नावांची घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. ऐरोलीतून गणेश नाईक यांच्या नावाची घोषणा भाजपाने केली आहे. त्यांच्याविरोधात तिसऱ्या आघाडीने अंकुश सखाराम कदम यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

तिसऱ्या आघडीचे उमेदवार 

  • प्रकाश उर्फ बच्चू बा. कडू – अचलपूर (प्रहार जनशक्ती पक्ष)
  • अनिल छबिलदास चौधरी – रावेर यावल (प्रहार जनशक्ती पक्ष)
  • गणेश रमेश निंबाळकर – चांदवड (प्रहार जनशक्ती पक्ष)
  • सुभाष साबणे – देगलूर बिलोली (SC) (प्रहार जनशक्ती पक्ष)
  • अंकुश सखाराम कदम – ऐरोली (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष)
  • माधव दादाराव देवसरकर – हद‌गाव हिमायतनगर (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष)
  • गोविंदराव सयाजीराव भवर – हिंगोली (महाराष्ट्र राज्य समिती)
  • वामनराव चटप – राजुरा (स्वतंत्र भारत पक्ष)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.