Assembly Election मध्ये घातपात घडवण्याचा कट रचणारे ५ नक्षलवादी ठार

102
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) धामधूम सुरु झाली असताना या निवडणुकीत घातपात घडवून आणण्याचा नक्षलवादी कट रचत होते. त्यातील ५ नक्षलवाद्यांचा जवानांनी खात्मा केला. गडचिरोली (Gadchiroli) महाराष्ट्र व नारायणपूर छत्तीसगड सीमेलगत असलेल्या कोपर्शी तालुका भामरागड जंगल परिसरात हे माओवादी (Naxal) दबा धरून बसल्याची गोपनीय माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाल्याने अप्पर पोलीस अधीक्षक अभियान यतिश देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन एम .रमेश यांचे नेतृत्वात सी 60 पथकाच्या 22 तुकड्या व सीआरपीएफ च्या QAT च्या 02 तुकड्या या कोपर्शी जंगल परिसरात मोहीम राबवत आहेत.
दोन वेगवेगळ्या ठिकाणी माओवाद विरोधी अभियान राबविण्याकरिता या तुकड्या रवाना करण्यात आल्या. त्यातच, माओवादी व जवानांमध्ये चकमक झाल्यानंतर 5 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला. गडचिरोली पोलिसांचे पथक जंगल परिसरात पोहोचताच माओवाद्यांनी पोलीस पथकाच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस पथकाकडून माओवाद्यांना शस्त्र खाली टाकून शरण येण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु, माओवाद्यांनी शरण न येता पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार सुरू ठेवला. गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलीस पथकाकडून दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार करावा लागला, या अभियानात 05 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले झाले. जंगल परिसरात शोधमोहीम सुरू असून मृत माओवाद्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे. (Assembly Election)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.