स्वराज इंडिया पक्षाचे संस्थापक तसेच भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांनी दि. २१ ऑक्टोबर रोजी अकोल्यात विचारसभा घेतली. त्यावेळी वंचितचे (Vanchit Bahujan Aaghadi) कार्यकर्तेही तिथे उपस्थित होते. मात्र काँग्रेसच्या आरक्षणविरोधी भूमिकेबाबत यादव यांना प्रश्न विचारत वंचितच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात एकच राडा घातला. यावेळी योगेंद्र यादव यांना धक्काबुक्की करण्यात आली. तसेच खुर्च्यांची ही तोडफोड झाली. (Vanchit Bahujan Aaghadi)
(हेही वाचा : Baba Siddique Murder : मुंबईत पुन्हा गॅंगवॉर, दाऊद टोळी पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता)
नेमकं काय घडले?
महाराष्ट्र डेमोक्रेटीक फोरम आणि भारत जोडो अभियानांतर्गत योगेंद्र यादव यांच्या विचारसभेचे आयोजन शहरातील जिल्हा परिषद कर्मचारी भवनाच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी योगेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनात ‘लोकशाहीची सुरक्षा आणि आपले मत’ या विषयावर विचारसभा सुरू होती. या विचारसभेमध्ये योगेंद्र यादव यांचे भाषण सुरू असतांना सभागृहात उपस्थित वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले.(Vanchit Bahujan Aaghadi)
आरक्षणविरोधी भूमिका घेणाऱ्या व आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसला मतदान कसे करावे? असा प्रश्न योगेंद्र यादव यांना वंचितच्या पदाधिकाऱ्यांकडून विचारण्यात आला. तसेच विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची मते कशी फुटली, असा सवाल ही वंचितच्या (Vanchit Bahujan Aaghadi) कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी विचारला. यावरूनही विचारसभेमध्ये मोठा वाद निर्माण झाला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली. वंचितच्या (Vanchit Bahujan Aaghadi) कार्यकर्त्यांनी योगेंद्र यादव यांना धक्काबुक्की केली. (Vanchit Bahujan Aaghadi)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community