Vishva Hindu Parishad च्या मंदिर स्वच्छता सेवा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

100
Vishva Hindu Parishad च्या मंदिर स्वच्छता सेवा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Vishva Hindu Parishad च्या मंदिर स्वच्छता सेवा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मंदिर स्वच्छता सेवा अभियानात सहभागी होण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषदेच्या मंदिर अर्चक मंदिर अर्चक पुरोहित आयामाने केले होते. या आवाहनाला महाराष्ट्र व गोवा राज्यात समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यात ६५६० मंदिरे आणि धार्मिक स्थानाच्या स्वच्छतेसाठी विविध संस्था संघटनांचे साधारण ६० हजार कार्यकर्ते सेवाकार्यात सहभागी झाले होते. दि. २० ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते ११ या वेळेत हे अभियान सर्वत्र राबवले गेले. अभियानाचे हे यंदाचे दुसरे वर्ष आहे. (Vishva Hindu Parishad)

( हेही वाचा : Vanchit Bahujan Aaghadi चा काँग्रेसला विरोध; आरक्षणाविरोधी भूमिका रडारवर

मंदिर स्वच्छता सेवा अभियानाअंतर्गत कोकणमध्ये १५००, पश्चिम महाराष्ट्र प्रांतात ८५०,विदर्भात १२१०,देवगिरी प्रांतात १८५० आणि गोवा राज्यात १५० संख्येने मंदिर स्वच्छता सेवा करण्यात आली. यावेळी महिला आणि पुरुषांनी मिळून मंदिरे, बौद्ध विहार, जैन स्थानक, गुरुद्वारे तसेच हिंदू धर्मातील सर्व धार्मिक स्थानांच्या स्वच्छता केली. गेल्या दोन वर्षांपासून मंदिर आयामाच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबवला जात असून मागील वर्षी ५५० मंदिरांमध्ये कार्यकर्त्यांनी स्वच्छता सेवा केली होती. (Vishva Hindu Parishad)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.