भाषांतरांच्या बहाण्याने शिक्षिका सुलतानाने केली PM Modi यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी

299
भाषांतरांच्या बहाण्याने शिक्षिका सुलतानाने केली PM Modi यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी
भाषांतरांच्या बहाण्याने शिक्षिका सुलतानाने केली PM Modi यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी

बिहारच्या गोपालगंज येथील एका सरकारी शाळेत महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे इंग्रजी अनुवाद करण्यास सांगून त्यामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी करण्यात आली. यावेळी सुलताना खातून नामक शिक्षिकेने विद्यार्थ्यांना, गेल्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) लोकांना मूर्ख बनवले.या विधानाचा भाषांतर करण्यास सांगितले. दि. ५ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली असून विद्यार्थ्यांनी पालकांना दिलेल्या घटनेच्या माहितीमुळे प्रकरणाला गती मिळाली.

( हेही वाचा : Assembly Election 2024 : मातोश्रीवर शिवसेनेचा माणूस कोण? शिवसैनिकांमध्ये चर्चा

कट्टरपंथी शिक्षिका सुलताना खातून काही दिवसांपूर्वी गोपालगंजमधील एका सरकारी शाळेत इंग्रजीचा तास घेत होत्या. त्यावेळी भाषांतराच्या नावाखाली खातूनने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर आक्षेपार्ह विधान करत, विद्यार्थ्यांना भाषांतर करण्यास भाग पाडले. मात्र विद्यार्थ्यांमधील काहींनी घरी गेल्यावर घटनेची माहिती पालकांना दिली. ज्यामुळे पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी शिक्षणाधिकारी लखिंद्र दास यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षिकेकडे याप्रकरणात केलेल्या कृत्याबद्दल जाब विचारला.

दरम्यान याप्रकरणी शिक्षणाधिकारी लिखिंद्र दास म्हणाले की, शिकवत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Modi) अशोभनिय टिप्पणी केलेल्या शिक्षिकेला असे वर्तन शोभत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून याप्रकरणाबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. त्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे ही दास म्हणाले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.