मुंबईतील वरळी मतदार संघात शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरे घेरण्याची तयारी महायुतीने केल्याची चर्चा आहे. ठाकरे हे वरळीतूनच विधानसभा निवडणूक लढणार हे आता जवळपास निश्चित झाले असून मनसेकडून संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्या उमेदवारीवर अद्याप शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. त्यामुळे शिवसेनेकडून या जागेवर मैत्रीपूर्ण लढतीसाठी तुलनेने ‘कमजोर’ उमेदवार देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
(हेही वाचा – डोके फोडले, जबडा फाडला; बहराइचमध्येही इस्लामिक जमावाने Sudhakar Tiwari यांच्यावरही केलेला हल्ला)
तुलनेने ‘कमजोर’ उमेदवार
मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा २०२४ निवडणुकीत एकही उमेदवार न देता महायुतीला बिनशर्थ पाठींबा दिला होता. त्याची परतफेड महायुतीकडून या विधानसभा निवडणुकीत करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. काही मतदार संघात मनसेला मदत व्हावी यासाठी ‘मैत्रीपूर्ण लढती’ची किंवा उमेदवार देण्यात येणार नसल्याचे बोलले जात आहे. वरळी हा त्यातील एक मतदार संघ असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेकडून भाजपा नेत्या शायना एन. सी. (Shaina NC) यांना ‘धनुष्यबाण’ चिन्हावर लढविण्यात येणार असल्याची चर्चा आहे तर मनसेकडून संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) नशीब आजमावणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ठाकरे विरुद्ध देशपांडे या थेट लढतीसाठी शिवसेनेकडून (शिंदे) शायना एन. सी. (Shaina NC) या तुलनेने ‘कमजोर’ उमेदवाराची निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
शायना कमजोर कश्या?
यामुळे शायना एन. सी. (Shaina NC) यांना उमेदवारी दिली गेली आणि त्यांच्यावरील अन्याय दूर झाला, असे चित्र निर्माण व्हायला मदत होईल. शायना एन. सी. (Shaina NC) या वरळी मतदार संघासाठी बाहेरील उमेदवार असून अमराठी आहेत. वरळी मतदार संघात प्रामुख्याने मराठी मतदार असल्याने त्या किती प्रभावी ठरतील यात शंका आहे. परिणामी शिवसेनेची ठाकरे यांच्या विरोधातील मराठी मते मनसेच्या वाट्याला जातील, असे यामागचे गणित असू शकते. त्यामुळे शायना एन. सी. या शिवसेनेच्यादृष्टीने ‘कमजोर’ उमेदवार ठरू शकतात.
(हेही वाचा – Coastal Road वरील मालाड चारकोपमधील जुळ्या बोगद्यासाठीचा सल्ला १६४ कोटींचा)
ठाकरेंना प्रचंड मताधिक्य
२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत वरळी मतदार संघात आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) एकतर्फी प्रचंड मतांनी विजयी झाले होते. ठाकरे यांना ८९,२४८ मते म्हणजेच एकूण मतदानाच्या जवळपास ७३ % मतदान झाले होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश माने यांना केवळ २१,८२१ मते मिळून ते दुसऱ्या क्रमांकावर होते. वंचित बहुजन आघाडीचे गौतम गायकवाड यांना ६,५७२ इतकी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. तर अन्य दहा उमेदवारांना एकत्रित ४,००० मतांचा आकदाही पार करता आला नाही.
ठाकरे यांना शह देण्याची रणनीती
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे ठाकरे घराण्यातील गंभीरपणे निवडणूक लढणारी बहुदा पहिली व्यक्ती होती. त्यामुळे त्यांनी प्रचंड मताधिकयाची तयारी आधीच करून ठेवली होती. वरळीचे मागील दोन निवडणुकीत निवडून आलेले शिवसेनेचे सुनील शिंदे आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सचिन अहिर यांची मदत घेतली. शिंदे हे शिवसेनेचेच होते तर विरोधातील अहिर यांना २०१९ च्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेत ‘आयात’ करण्यात ठाकरेंनी यश मिळवले आणि वरळीत ठाकरे यांच्या जवळपासही कुणी उमेदवार नसेल याची तजवीज करूनच निवडणूक रिंगणात उडी घेतली. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही पक्षाची ताकद असून केवळ पहिला ठाकरे म्हणून त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नाही. आता मात्र मनसेने या मतदार संघात महायुतीसोबत आदित्य ठाकरे यांना शह देण्याची रणनीती आखली असून ठाकरे त्यातून सुखरूप बाहेर पडतात की महायुतीच्या चक्रव्यूहात अडकतात हे काळच ठरवेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community