भारत चीनमध्ये सहमती! पूर्व लडाखमधील सीमेवर गस्तीबाबत काय म्हणाले S. Jaishankar?

117
भारत चीनमध्ये सहमती! पूर्व लडाखमधील सीमेवर गस्तीबाबत काय म्हणाले S. Jaishankar?
भारत चीनमध्ये सहमती! पूर्व लडाखमधील सीमेवर गस्तीबाबत काय म्हणाले S. Jaishankar?

भारत आणि चीनच्या (India-China) सैनिकांदरम्यान जून २०२०मध्ये पूर्व लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर सीमेवरील तणाव कमी करण्यासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेण्यात दोन्ही देशांना यश आले आहे. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबारेषेवरील काही संवेदनशील ठिकाणी गस्त घालण्यासंबंधी भारत आणि चीनदरम्यान सहमती झाल्याची घोषणा परराष्ट्र मंत्रालयाकडून सोमवारी करण्यात आली. (S. Jaishankar)

(हेही वाचा-Aaditya Thackeray यांना घेरण्याची महायुतीची तयारी?)

सध्या प्रत्यक्ष ताबारेषेच्या दोन्ही बाजूंना ५०,००० ते ६०,००० सैनिक तैनात आहेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनीही एका खासगी कार्यक्रमात याला दुजोरा दिला. भारत आणि चीनच्या जवानांदरम्यान साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या थेट संघर्षानंतर सीमावाद पूर्णपणे सुटलेला नाही. मात्र, संघर्ष होणाऱ्या अनेक ठिकाणी दोन्ही बाजूंनी सैन्यमाघारी झाली आहे. प्रत्यक्ष ताबारेषेवरील डेपसांग आणि डेमचोक या भागांमधील गस्तीसंबंधी सहमती झाली असल्याचे समजते. या दोन्ही ठिकाणी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) माघार घ्यावी यासाठी भारताने आग्रह धरला होता. याच मुद्द्यावरून आतापर्यंत चर्चेतून ठोस निष्पन्न होत नव्हते. अखेर, चीनने भारताची मागणी मान्य केल्याचे दिसत आहे.

(हेही वाचा-Vishva Hindu Parishad च्या मंदिर स्वच्छता सेवा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद)

1 ऑक्टोबर रोजी भारतीय लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी (Indian Army Chief Upendra Dwivedi) म्हणाले होते की, चीनसोबत भारताची परिस्थिती स्थिर आहे, परंतु ती सामान्य नाही, ती खूपच संवेदनशील आहे. आपल्याला लढावे लागेल, सहकार्य करावे लागेल, एकत्र राहावे लागेल, चीनला सामोरे जावे लागेल आणि आव्हान द्यावे लागेल. ते म्हणाले होते की, एप्रिलपासून भारत आणि चीनमध्ये 17 कमांडर स्तरावरील बैठका झाल्या आहेत. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. (S. Jaishankar)

(हेही वाचा-Vanchit Bahujan Aaghadi चा काँग्रेसला विरोध; आरक्षणाविरोधी भूमिका रडारवर)

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी 12 सप्टेंबर रोजी स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे झालेल्या शिखर परिषदेत सांगितले होते की, चीनसोबतचा 75 टक्के वाद मिटला आहे. सीमेवर वाढत्या लष्करीकरणाचा मुद्दा अजूनही गंभीर असल्याचेही परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले होते. (S. Jaishankar)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.