Bomb Threat : सिंगापूर-पुणेसह विस्ताराच्या ६ विमानांना बॉम्बची धमकी; पुण्यात प्रवाशांना उतरवून विमानाची तपासणी 

76
Bomb Threat : सिंगापूर-पुणेसह विस्ताराच्या ६ विमानांना बॉम्बची धमकी; पुण्यात प्रवाशांना उतरवून विमानाची तपासणी 
Bomb Threat : सिंगापूर-पुणेसह विस्ताराच्या ६ विमानांना बॉम्बची धमकी; पुण्यात प्रवाशांना उतरवून विमानाची तपासणी 

देशातील प्रवासी विमानांना बाॅम्बच्या धमक्यांची (Bomb Threat) मालिका सुरूच आहे. त्यामुळे विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याच्या वारंवार घटना घडत आहे. त्यानंतर पूर्ण तपासणीनंतर विमाने रवाना करण्यात येत आहेत. त्यामुळे शेकडो प्रवाशांचे तासनतास हाल झाले. हा खळबळजनक प्रकारा ताजा असताना पुण्यातून अशीच एक बातमी समोर आली आहे. सिंगापूर ते पुणे विमानासह (Singapore to Pune flight bomb threat) विस्तारा कंपनीच्या एकूण ६ आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये बाॅम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने पुणे विमानतळावर रविवारी सिंगापूर-पुणे विमानाची कसून तपासणी करण्यात आली. मात्र विमानात कोणतीही संशयास्पद बाॅम्बसदृश वस्तू आढळून आली नाही. (Bomb Threat)

बॉम्ब ठेवल्याचा समाज माध्यमांवर संदेश

६ विमानांमध्ये १२ जण बॉम्बसह बसले आहेत, विमानातील प्रत्येकाचा शेवट होईल, असा संदेश समाज माध्यमातून पसरविण्यात आला होता. तसेच त्या सहा विमानांचे क्रमांकही देण्यात आले होते. गेल्या ६ दिवसांत विमानात बाॅम्बची धमकी मिळाल्याची पुण्यातील ही तिसरी घटना आहे. देशभरात एकूण १०० पेक्षा अधिक घटना घडल्या असून याप्रकरणी कडक कायदा करण्याचे केंद्र सरकारने सांगितले. दरम्यान, या महिन्यात विमानात बाॅम्ब (Bomb Threat) ठेवल्याच्या एकापाठोपाठ एक अशा १०० पेक्षा अधिक घटना घडल्यानंतर सोमवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने याची गंभीर दखल घेतली आहे.

रविवारी दुपारी विस्तारा कंपनीच्या सिंगापूर-पुणे विमानात बाॅम्ब ठेवल्याचा एक संदेश ‘स्किझोफ्रेनिया १११’या (Schizophrenia 111) सोशल मीडिया साइट ‘एक्स’वरून पुणे पोलिसांना देण्यात आला.त्या संदेशात एकूण विस्तारा कंपनीच्या ६ आंतरराष्ट्रीय उड्डाण करणाऱ्या विमानांचे क्रमांक होते. त्यापैकी यूके ११० क्रमांकाचे विमान सिंगापूर ते पुणे असे होते. हे विमान पुण्यात धावपट्टीवर उतरल्यानंतर सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. पोलिसांचे बाॅम्बशोधक-नाशक पथक आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान दाखल झाले. (Bomb Threat)

(हेही वाचा – विदर्भातील जागा सोडल्यास Congress चे काय नुकसान होणार?)

प्रवाशांची त्यांच्याजवळील लगेजची तसेच विमानाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात श्वान पथकाच्या साह्याने तपासणी करण्यात आली. या तपासणीत बॉम्ब सदृश कोणतीही वस्तू आढळली नाही. यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. दरम्यान, या तपासणीमुळे विमानसेवा वेळापत्रकावर कोणताही परिणाम झाला नाही, पुणे विमानतळ (Pune Airport Bomb Threat) संचालक संतोष ढोके यांनी सांगितले. या धमकी प्रकरणी स्क्रिझोफ्रेनिया १११ या एक्सवरील खात्याच्या युजरविरोधात विमानतळ प्रशासनाकडून मुनीष कोतवाल यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.