Maharashtra Assembly Election 2024: अजित पवार गटाचे १६ उमेदवार ठरले; ‘या’ नेत्यांना एबी फॉर्म मिळाले

115
Maharashtra Assembly Election 2024: अजित पवार गटाचे १६ उमेदवार ठरले; 'या' नेत्यांना एबी फॉर्म मिळाले
Maharashtra Assembly Election 2024: अजित पवार गटाचे १६ उमेदवार ठरले; 'या' नेत्यांना एबी फॉर्म मिळाले

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar ) गटाने 16 उमेदवारांना आज एबी फॉर्म (Maharashtra Assembly Election 2024) दिले आहेत. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर नेत्यांची रीघ सुरूच आहे. देवगिरी बंगल्यावर आतापर्यंत आलेले 16 जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. राष्ट्रवादीच्या 16 नेत्यांमध्ये छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ, दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे यांचा समावेश आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

रविवारी भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये 99 जणांचा समावेश आहे. भाजपची पहिली यादी जाहीर होताच काही ठिकाणी ज्या इच्छूकांना तिकीट मिळालं नाही त्यांच्यामध्ये नाराजी दिसून आली. 99 जागांपैकी एकूण 13 मतदारसंघात भाजपकडून महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. भाजपनंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात देखील हालचालींना वेग आला असून, दोन्ही पक्षांकडून कोणत्याही क्षणी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

यांना मिळाले एबी फॉर्म (Maharashtra Assembly Election 2024)

1. संजय बनसोडे 2. चेतन तुपे 3. सुनील टिंगरे 4. दिलीप वळसे पाटील 5. दौलत दरोडा 6. राजेश पाटील 7. दत्तात्रय भरणे 8. आशुतोष काळे 9. हिरामण खोसकर 10. ⁠नरहरी झिरवळ 11. ⁠छगन भुजबळ 12. ⁠भरत गावित 13. ⁠बाबासाहेब पाटील 14. ⁠अतुल बेनके 15. ⁠नितीन पवार 16. ⁠इंद्रनील नाईक 17. ⁠बाळासाहेब आजबे

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.