Thane hit and run case: मर्सिडीजच्या धडकेत २१ वर्षीय मुलाचा मृत्यू, आरोपी फरार

205
Thane hit and run case: मर्सिडीजच्या धडकेत २१ वर्षीय मुलाचा मृत्यू, आरोपी फरार
Thane hit and run case: मर्सिडीजच्या धडकेत २१ वर्षीय मुलाचा मृत्यू, आरोपी फरार

ठाण्यातून हिट अँड रनची (Thane hit and run case) घटना समोर येत आहे. 21 ऑक्टोबर रोजी रात्री एका मर्सिडीज कारने 21 वर्षांच्या मुलाला चिरडले आहे. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. नौपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शन हेगडे (Darshan Hegde) असं मृत मुलाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 21 वर्षांचा दर्शन हेगडे सोमवारी रात्री खाण्याचे सामान आणण्यासाठी बाहेर पडला होता. सामान घेऊन घरी परतत असतानाच नाशिक महामार्गाकडे जाणाऱ्या मर्सिडीजने धडक दिली. (Thane hit and run case)

(हेही वाचा-भारत चीनमध्ये सहमती! पूर्व लडाखमधील सीमेवर गस्तीबाबत काय म्हणाले S. Jaishankar?)

दर्शनला मर्सिडिजने चिरडल्यानंतर चालक घटनास्थळावरुन पसार झाला. मात्र, दर्शनचा जागीच मृत्यू झाला आहे. घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कार जप्त केली आहे. तर, या प्रकरणात अधिक चौकशी करण्यात येत आहे. (Thane hit and run case)

(हेही वाचा-Bomb Threat : सिंगापूर-पुणेसह विस्ताराच्या ६ विमानांना बॉम्बची धमकी; पुण्यात प्रवाशांना उतरवून विमानाची तपासणी )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानापासून काहीच अंतरावर हा अपघात घडला आहे. जिथे अपघात घडला तेथील CCTV कॅमेरे बंद पडले होते. एका भरधाव मर्सिडीज गाडीने एका २१ वर्षीय निष्पाप मुलाला चिरडल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. (Thane hit and run case)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.