ठरलं तर! Nilesh Rane तब्बल २० वर्षांनी धनुष्यबाण हातात घेणार, कुडाळमधून लढणार?

177
ठरलं तर! Nilesh Rane तब्बल २० वर्षांनी धनुष्यबाण हातात घेणार, कुडाळमधून लढणार?
ठरलं तर! Nilesh Rane तब्बल २० वर्षांनी धनुष्यबाण हातात घेणार, कुडाळमधून लढणार?

माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) तब्बल २० वर्षांनी शिंदेंच्या शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करणार आहेत. बुधवारी (23 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे. आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात निलेश राणे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत यासंबंधी माहिती दिली आहे. (Nilesh Rane)

(हेही वाचा-‘कॉमन मॅन’ असलेला सीएम जनतेला ‘सुपर मॅन’ बनवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही: CM Eknath Shinde)

नीलेश राणे (Nilesh Rane) म्हणाले, “मी 2019 ला राणे साहेबांसोबत, नितेश राणेसोबत (Nitesh Rane) आणि आमचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी यांना घेऊन आम्ही भारतीय जनता पक्षात आलो. भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर खूप आदर मिळाला. सगळ्या नेत्यांनी खूप आदर दिला, प्रेम दिला. भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्याची जी शिस्त आहे ती शिकायला मिळाली. जी जवळून बघितली. सन्माननीय फडणवीस साहेबांनी तर एका लहान भावाप्रमाणे मला सांभाळलं. काही अडचणी आल्या त्यामधून मला बाहेर काढलं. पक्षामध्ये एक स्थान दिलं. तसंच सन्माननीय रविंद्र चव्हाण साहेब असतील त्यांनी एका भावाप्रमाणे मला सांभाळलं. सन्माननीय गिरीश महाजन साहेब असतील, सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील असतील, सन्माननीय मुनगंटीवार साहेब असतील. अनेक जीवाभावाचं संबंध या पक्षात माझे आहेत पुढेही राहतील.” (Nilesh Rane)

(हेही वाचा-Abhijit Katke: डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेच्या घरी आयकर विभागाची धाड!)

“राजकारणामध्ये जेव्हापासून सुरुवात झाली. तेव्हापासून राणे साहेबांच्या सावलीमध्ये ते जसे बोलतील, जे बोलतील कधीही प्रश्न न विचारता मी त्यांच्याबरोबर राहिलो. उद्या 23 तारखेला 4 वाजता सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि काही मंत्रिमंडळातलं सहकारी कुडाळ हायस्कूल ग्राऊंडवर प्रवेशाची सभा होणार आहे. तो प्रवेश उद्या नक्की झालेला आहे. मी सन्माननीय शिंदे साहेबांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो. आगामी विधानसभा निवडणूक मी जिंकणार.” असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला. (Nilesh Rane)

“उद्या 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील सहकारी यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे प्रवेशाची सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत कुडाळ मतदारसंघातून आम्हाला 27 हजारांचं मताधिक्य मिळालं. 90 टक्के ग्रामपंचायत, खरेदी-विक्री संघ, बाजार समिती, कृषी सोसायटीवर आमची सत्ता आहे. त्यासह लोकसभेलाही आमचा खासदार निवडून आला आहे. महायुतीत आम्ही सगळ्या निवडणुका जिंकल्या. विधानसभाही (Maharashtra Assembly Election 2024) आम्ही जिंकणार आहोत.” असा विश्वास नीलेश राणे यांनी व्यक्त केला. (Nilesh Rane)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.