विजयवाडा जंक्शन रेल्वे स्थानक हे आंध्र प्रदेशच्या विजयवाडा नावाच्या विभागाचं भारतीय रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक विजयवाडा रेल्वे विभागातलं नॉन-सबर्बन ग्रेड-१ म्हणजेच NSG-1 स्थानक म्हणून वर्गीकृत आहे. हावडा-चेन्नई आणि नवी दिल्ली-चेन्नई यांसारख्या मुख्य रेल्वे मार्गांच्या जंक्शनवर असलेलं विजयवाडा हे, हावडा जंक्शन, कानपूर सेंट्रल आणि नवी दिल्लीनंतर देशातलं चौथं सर्वांत व्यस्त असलेलं रेल्वे स्थानक आहे.
या स्थानकावरुन दररोज सुमारे १.४० लाख प्रवाशांना, १९० पेक्षा जास्त एक्स्प्रेस गाड्यांना आणि सुमारे १७० मालवाहू गाड्यांना सेवा दिली जाते. विजयवाडा हे स्थानक भारतीय रेल्वे मार्गावर असलेल्या प्रमुख राष्ट्रीय रेल्वे जंक्शन्सपैकी एक आहे. सप्टेंबर २०२३ साली या स्थानकाला IGBC म्हणजेच इंडियन ग्रीन बिल्डिंग काऊन्सिल यांच्याकडून इथल्या पर्यावरणीय प्रकल्पांसाठी प्लॅटिनम रेटिंग प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. (vijayawada junction railway station)
(हेही वाचा – Supreme Court : निवडणूकीपूर्वी अजित पवारांना चिन्हाबाबत सर्वोच्च दिलासा ; तर शरद पवारांना मोठा धक्का!)
विजयवाडा रेल्वे स्थानकाचा इतिहास
विजयवाडा जंक्शन हे रेल्वे स्थानक १८८८ साली बांधण्यात आलं होतं. त्यावेळेस दक्षिण महाराष्ट्र रेल्वेचा मुख्य पूर्वेकडचा रेल्वे मार्ग विजयवाडा येथून जाणाऱ्या इतर रेल्वे मार्गांशी जोडला गेला होता. त्यानंतर पुढे १८८९ साली निझामाच्या स्टेट रेल्वेने सिकंदराबाद रेल्वे स्टेशन आणि विजयवाडा दरम्यान बेझवाडासाठी विस्तारित रेल्वे म्हणून एक मार्ग बांधला. त्यानंतर विजयवाडा रेल्वे स्थानक हे वेगवेगळ्या दिशांनी जाणाऱ्या तीन रेल्वे मार्गाचं जंक्शन बनलं.
१ नोव्हेंबर १८९९ साली विजयवाडा आणि चेन्नई दरम्यान ब्रॉड-गेज लाइन बांधण्यात आली. त्यामुळे चेन्नई, मुंबई, हावडा, नवी दिल्ली आणि हैदराबाद या मुख्य स्थानकांदरम्यान रेल्वे प्रवास शक्य झाला. पुढच्या काही दशकांमध्ये भारतातल्या सर्व स्वतंत्र रेल्वे मार्गाचं राष्ट्रीयीकरण होईपर्यंत विजयवाडा रेल्वे स्थानक हे जंक्शन म्हणून विकसित करण्यात आलं. पुढे १९५० साली तत्कालीन भारत सरकारने रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय रेल्वेची स्थापना केली. तेव्हा विजयवाडा रेल्वे स्थानक हे विजयवाडा विभागाचं मुख्यालय म्हणून दक्षिण रेल्वेकडे सोपवण्यात आलं.
१९६६ साली एक नवीन झोन दक्षिण मध्य रेल्वेही तयार करण्यात आली. त्याचं मुख्यालय सिकंदराबाद रेल्वे स्थानक होतं. तेव्हा विजयवाडा विभाग आणि विजयवाडा जंक्शन हे नवीन रेल्वे मार्गामध्ये विलीन करण्यात आलं. (vijayawada junction railway station)
(हेही वाचा – Maharashtra Assembly Polls : महाविकास आघाडीत फूट!)
विजयवाडा रेल्वे स्थानकाची सर्व्हिस
विजयवाडा रेल्वे स्थानकावर दररोज सरासरी १.४० लाख आणि दरवर्षी सुमारे ५० दशलक्ष प्रवाशांना सेवा पुरवण्यात येते.
विजयवाडा रेल्वे स्थानकावर दररोज २५० पेक्षा जास्त प्रवासी गाड्या आणि सुमारे १५० मालगाड्या थांबतात. यांपैकी प्रत्येक गाडी किमान १५ ते २० मिनिटे या रेल्वे स्थानकावर थांबते. (vijayawada junction railway station)
- विजयवाडा रेल्वे स्थानकाच्या फलाटांची संख्या – १०
- विजयवाडा रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या प्रवासी गाड्या – २५८
- मालवाहू गाड्या – १५०
- दररोजची प्रवासी संख्या – १.४० लाख
- वार्षिक प्रवासी संख्या- ५० दशलक्ष
हेही पहा –
Join Our WhatsApp Community