Jammu and Kashmir मध्ये नवी दहशतवादी संघटना सक्रिय! TLM करतेय दहशतवाद्यांची भरती

66
Jammu and Kashmir मध्ये नवी दहशतवादी संघटना सक्रिय! TLM करतेय दहशतवाद्यांची भरती
Jammu and Kashmir मध्ये नवी दहशतवादी संघटना सक्रिय! TLM करतेय दहशतवाद्यांची भरती

जम्मू काश्मिरमध्ये (Jammu and Kashmir) तेहरीक लब्बैक मुस्लिम (TLM ) नावाची नवी संघटना सक्रिय झाल्याचे उघड झाले आहे. काउंटर इंटेलिजन्स विंग (CIK) आणि पोलिसांनी मंगळवारी (२२ ऑक्टो.) श्रीनगर, गांदरबल, बांदीपोरा, अनंतमाग आणि पुलवामा येथील अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. तेहरीक लब्बैक मुस्लिम ही प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैय्यबाचा वेगळा गट आहे. (Jammu and Kashmir)

(हेही वाचा-‘मविआ’तल्या तू तू मैं मैं नंतर काँग्रेसच्या Nana Patole यांना डच्चू; बाळासाहेब थोरातांकडे मोठी जबाबदारी)

टीएलएम हे दहशतवाद्यांची भरती करण्यासाठीचे मॉड्यूल होते, जे पाकिस्तानचे हँडलर बाबा हमास चालवत होता. काउंटर इंटेलिजन्स विंग आणि पोलिसांची कारवाई अजुनही सुरू आहे. गांदरबल हल्ल्यात ज्या ७ कामगारांचा मृत्यू झाला होता, त्या हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, दोन दहशतवादी शाल पांघरुन आले आणि मेसमध्ये बसलेल्या कामगारांवर त्यांनी हल्ला केला. याप्रकरणी आतापर्यंत १० ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. तर, ७ संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. 14 मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. काही साहित्यही जप्त करण्यात आले आहे. (Jammu and Kashmir)

(हेही वाचा-भारत चीनमध्ये सहमती! पूर्व लडाखमधील सीमेवर गस्तीबाबत काय म्हणाले S. Jaishankar?)

रेझिस्टन्स फ्रंट (TRF) नेही गांदरबल हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याचा मास्टरमाइंड टीआरएफ प्रमुख शेख सज्जाद गुल आहे. या हल्ल्यानंतर दोन दिवसांनी एजन्सींनी TLM ही नवीन संघटना उघड केली आहे. या टीएलएमचा गांदरबल हल्ल्यामागे हात आहे की नाही हे पुढील तपासात उघड होईल. (Jammu and Kashmir)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.