Salman Khan ला धमकी देणाऱ्याने मागितली माफी

150
शेतकऱ्याच्या मोबाईल वरून Salman Khan ला जीवे मारण्याची धमकी; गीतकाराला अटक
  • प्रतिनिधी 

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर धमकीचा मेसेज पाठवणाऱ्याचा आणखी एक मेसेज वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर आला आहे. दुसऱ्या मेसेजमध्ये त्याने सलमान खान आणि पोलिसांची माफी मागितली असून चुकून मेसेज पाठवला गेला असे त्याने दुसऱ्या मेसेजमध्ये म्हटले आहे. पोलिसांनी मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेतला असता हा मेसेज झारखंड येथून आल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांचे एक पथक झारखंडला रवाना झाले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

(हेही वाचा – Drugs : मेफेड्रोनसह पाणीपुरी विक्रेत्याला मालवणीतून अटक)

मागील आठवड्यात मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर एक मेसेज आला होता. त्या मेसेजमध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan)  उल्लेख करण्यात आला होता, “सलमान खानने लॉरेन्स बिश्नोईला ५ कोटी रुपये देऊन सेटलमेंट करावी, सलमानने पैसे दिले नाही तर त्याची अवस्था बाबा सिद्दीकी पेक्षा वाईट होईल,” असे मेसेजमध्ये म्हटले होते. या मेसेजने एकच खळबळ उडवून दिली होती, या प्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Poll : नाना पटोले मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतूनच बाहेर!)

मेसेज करणाऱ्याचा शोध घेण्यात येत असताना सोमवारी वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर दुसरा मेसेज आला आहे. त्यात मेसेज करणाऱ्याने माफी मागितली असून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी वैर संपवण्यासाठी खंडणीचा मेसेज चुकून पाठवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. ही आपली खूप मोठी चूक होती असेही त्याने मेसेजमध्ये म्हटले आहे. दरम्यान मेसेज करणाऱ्यांचा ठावठिकाणा पोलिसांना मिळाला असून हा मेसेज झारखंड मधून आला असून पोलिसांचे एक पथक झारखंडला रवाना झाले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.