वक्फ विधेयकावरील JPC बैठकीमध्ये खासदारांमध्ये हाणामारी

125
वक्फ विधेयकावरील JPC बैठकीमध्ये खासदारांमध्ये हाणामारी
  • प्रतिनिधी 

वक्फ विधेयकावर चर्चा करण्यासाठी जेपीसी (JPC) बैठक मंगळवारी झाली. यावेळी दोन खासदारांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. यामुळे बऱ्याच वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. वक्फ बोर्डाच्या बैठकीत भाजपा आणि टीएमसीच्या खासदारांमध्ये हाणामारी झाली. बराच गदारोळ होऊन सभा तहकूब करण्यात आली. घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी आणि भाजपा खासदार अभिजित गंगोपाध्याय यांच्यात हाणामारी झाली. भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये हाणामारी झाली.

(हेही वाचा – Dharavi Assembly Constituency : घराणेशाहीसाठी गायकवाड रडल्या, माझी धारावी मला द्या!)

हाणामारीदरम्यान कल्याण बॅनर्जी यांनी तेथे ठेवलेली काचेची पाण्याची बाटली उचलून टेबलावर आपटून चुकून स्वत:ला जखमी केले. या सबंधित एका व्हिडिओमध्ये कल्याण बॅनर्जी यांना आयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पकडून नेले असल्याचे दिसत आहे. कल्याण बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर अभिजित गंगोपाध्याय यांनी आक्षेप व्यक्त केला होता. या बैठकीला अनेक निवृत्त न्यायाधीश, ज्येष्ठ वकील आणि अनेक लोक उपस्थित होते. (JPC)

(हेही वाचा – Police : पोलिसांची बदनामी केल्याबद्दल अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी)

बैठक सुरू असताना अचानक कल्याण बॅनर्जी उठले आणि बोलू लागले. त्यांनी बोलायला सुरुवात केली तेव्हा अभिजीत गंगोपाध्याय यांनी आक्षेप घेतला, त्यानंतर दोन्ही खासदारांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) खासदार तेजस्वी सूर्या यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून विरोधी सदस्यांवर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, विरोधी सदस्यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल आणि पॅनेलच्या बैठकीदरम्यान साक्षीदार यांना धमकावले आहे. (JPC)

(हेही वाचा – राज्यात CM पदाचे अनेक दावेदार; जाणून घ्या ८ मुख्यमंत्र्यांना विचित्र कारणांमुळे सोडावे लागलेले पद)

कल्याण बॅनर्जी एक दिवसासाठी निलंबित

दोन्ही खासदारांमध्ये वादावादी सुरू असताना कल्याण बॅनर्जी संतापले आणि त्यांनी जवळच ठेवलेली काचेची बाटली टेबलावर फेकून दिली. त्यामुळे बॅनर्जी यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले आहे. (JPC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.