काँग्रेसच्या मोहब्बतच्या दुकानात महिलांबद्दल द्वेष विकला जातो, अशी टीका भाजप आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली आहे. अजित चिखलीकर यांनी नांदेडमध्ये महिलांना साडी वाटप करताना वादग्रस्त विधान केले. त्यावर प्रतिक्रिया म्हणून आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी चिखलीकरांवर हल्लाबोल केला आहे.
( हेही वाचा : Assembly Election : शेकापचा मविआला बाय बाय; रायगड जिल्ह्यासह सांगोल्यात होणार परिणाम; 5 उमेदवार केले जाहीर)
यावेळी चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या की, नुकताच कराडमध्ये एक घटना घडली. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय अजित चिखलीकर (Ajit Chikhlikar) यांनी महिलांबद्दल अश्लाघ्य भाषा वापरत अकलेचे तारे तोडले. त्यामुळे चिखलीकरांनी लक्षात ठेवावे की, माय- माऊलींची साडी चोळी देऊन ओटी भरायची आपल्या महाराष्ट्राची, हिंदुंची, आपल्या शिवरायांची परंपरा आणि संस्कार आहेत. पण हिंदू संस्कार आणि काँग्रेस यांचा दूरान्वये संबंध नाही. त्यामुळे सत्तांध झालेल्या काँग्रेस नेत्यांची महिलांबद्दल वक्तव्य करताना जीभ घसरतेच. गोर-गरीब माय भगिनींना साड्या वाटप केले तर भरसभेत त्या बहिणींबद्दल अश्लाघ्य भाष्य करत बहिणींचा त्यांच्या परिस्थितीचा अपमान या निर्लज्ज नेत्याने केला, असे टीका ही वाघ (Chitra Wagh) यांनी केली.
तसेच वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या की, चव्हाणांच्या (Ajit Chikhlikar) जवळचा हा अजित चिखलीकर. महिलांवर चिखल उडवण्याची कुठलीही संधी सोडत नाही. गोर गरीब कामगार महिलांच्या संसाराला हातभार लावावा म्हणून शासनातर्फे भांडी वाटप योजना राबवली जाते. त्या योजनेची आणि गोरगरीब महिलांची या निलाजऱ्या माणसाने खिल्ली उडवली होती. त्यामुळे एकंदरीतच काँग्रेसला बहिणींच सुख पाहवत नाही. लाडकी बहिण योजनेबाबत थेट न्यायालयात जाणारी ही सावत्र भावंड आहेत. आता तर पृथ्वीराज चव्हाणांसमोर बहिणींबद्दल अपमान होतो. त्यामुळे ‘लडकी हुँ लड सकती हुँ’ हा फक्त तुमच्यासाठी नारा आहे. तो आम्ही खरा करून दाखवणार तुमच्या विरुद्धची संविधानिक लढाई आम्ही जिंकणार कारण लक्षात ठेवा या प्रत्येक बहिणींच्या मागे त्यांचा देवाभाऊ भक्कमपणे उभा आहे, असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community