Maharashtra Assembly Election 2024 : प्रत्येक मतदान केंद्राचे सूक्ष्म नियोजन करुन अंमलबजावणी

510
Maharashtra Assembly Election 2024 : प्रत्येक मतदान केंद्राचे सूक्ष्म नियोजन करुन अंमलबजावणी
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

प्रत्येक मतदान केंद्रावर (Voting Centre) मतदारांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहे, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्प आदि सुविधा पुरविण्यात येणार असून प्रत्येक मतदान केंद्राचे सूक्ष्म नियोजन करुन अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात विविध पथके तैनात करण्यात आली असून यासाठी क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी (मुंबई शहर) डॉ. अश्विनी जोशी ( Ashwini Joshi) यांनी सांगितले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. या पत्रकार परिषदेस मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अति. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी निवडणूक फरोग मुकादम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे तसेच मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा

मतदारांना मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी (मुंबई शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अति. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख,अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी निवडणूक फरोग मुकादम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे तसेच मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – Dharavi Assembly Constituency : घराणेशाहीसाठी गायकवाड रडल्या, माझी धारावी मला द्या!)

जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज

सर्व निवडणूक प्रक्रिया निःपक्षपाती, भयमुक्त आणि शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज असून सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी (Mumbai City collector) तथा अति. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे. मतदान केंद्रावर मतदारांना अडचणी येणार नाहीत याची दक्षता घेऊन प्रत्येक मतदान केंद्रावर प्रतीक्षा कक्ष, टोकन सिस्टीम याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी स्पष्ट केले.

शालेय विद्यार्थ्यांकडून पालकांना मतदानासाठी संकल्पपत्र…

मतदारांना मतदान केंद्राची माहिती व्हावी यासाठी बीएलओमार्फत घरोघरी मतदार चिठ्ठीचे वाटप करण्याची मोहीम सुरू आहे. मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून शालेय विद्यार्थ्यांकडून पालकांना मतदानासाठी संकल्पपत्र हा अभिनव उपक्रम मुंबई शहर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले.

निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात

भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई शहर जिल्ह्यात १० विधानसभा मतदारसंघांसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी आचारसंहितेच्या काटेकोर व प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात येत आहे.

(हेही वाचा – Police : पोलिसांची बदनामी केल्याबद्दल अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी)

मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारांची माहिती
  • एकूण मतदान केंद्र – २ हजार ५३७
  • उत्तुंग इमारतीमधील (Highrise Building) मतदान केंद्र – १५६
  • सहकारी गृहनिर्माण सोसायटी मधील मतदान केंद्र १००
  • झोपडपटटी परिसरात मतदान केंद्र ३१३
  • मुंबई शहर जिल्हयात मंडपातील मतदान केंद्र ७५
विधानसभा मतदारसंघ निहाय मतदार संख्या

धारावी – २ लाख ६१ हजार ०१२
सायन-कोळीवाडा – २ लाख ८१ हजार ४८२
वडाळा – २ लाख ०५ हजार १२
माहिम – २ लाख २५ हजार ४१५
वरळी – २ लाख ६३ हजार ६९७
शिवडी – २ लाख ७४ हजार ४७२
भायखळा – २ लाख ५८ हजार १२
मलबार हिल – २ लाख ६० हजार ६७२
मुंबादेवी – २ लाख ४१ हजार ४५४
कुलाबा – २ लाख ६४ हजार ९३१

अशी एकूण २५ लाख ३६ हजार १३९ मतदार संख्या आहे
  • महिला – ११ लाख ७२ हजार ९४४
  • पुरुष – १३ लाख ६२ हजार ९५१
  • तृतीयपंथी – २४४
  • ज्येष्ठ नागरिक (८५+) ५४ हजार ०३३
  • नवमतदार संख्या (१८-१९वर्ष) ३८ हजार ३२५
  • दिव्यांग मतदार – ६ हजार ३४४
  • सर्व्हीस वोटर – ३९२
  • अनिवासी भारतीय मतदार – ४०६

(हेही वाचा – Assembly Election : शेकापचा मविआला बाय बाय; रायगड जिल्ह्यासह सांगोल्यात होणार परिणाम; 5 उमेदवार केले जाहीर)

मतदारांच्या माहितीसाठी

https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावरुन मतदार यादीतील नावासंदर्भात माहिती उपलब्ध आहे या संकेत स्थळाला भेट द्यावी, तसेच अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्र. 1950 (टोल फ्री) वर संपर्क साधावा.
Voter helpline App – मतदारांना आपले नाव मतदार यादीत तपासता येईल व नवीन मतदार नोंदणी या ॲपद्वारे करता येईल.
KYC App – उमेदवारांबाबत माहिती या app वर उपलब्ध होऊ शकेल
Cvigil ॲपच्या मदतीने आचारसंहिता उल्लंघन संदर्भातील तक्रार करता येते त्यानंतर त्यावर केलेल्या कारवाईची माहिती १०० मिनिटांत तुमच्यापर्यंत पोहोचते.
जिल्हाधिकारी मुंबई शहर यांचे कार्यालय- नियंत्रण कक्ष क्र.- 022-2082 2781
निवडणूक नियंत्रण कक्ष – 7977363304

सुविधा पोर्टल

उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन पत्र व शपथपत्र भरण्याकरता व निवडणूकीच्या अनुषंगाने विविध परवानग्या मिळणेसाठी अर्ज करण्याकरिता सुविधा या पोर्टलवर सर्व माहिती उपलब्ध आहे.

C-Vigil app

१५ ते २२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण १४ तक्रारी प्राप्त झाल्या असून या तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. तर NGSP पोर्टलवर १०१ तक्रारी प्राप्त झाल्या असून ६७तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून उर्वरित तक्रारींवर कार्यवाही सुरु आहे.

मतदान केंद्रांवर सुविधा

प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, कचरापेटी, स्वच्छतागृह, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर तसेच रॅम्पची व्यवस्था, रांगांमध्ये गर्दी झाल्यास मतदारांना बसण्यासाठी खुर्ची किंवा बाकडे, मोकळ्या ठिकाणी मतदान केंद्र असल्यास मंडपाची उभारणी, पंखे आदी निश्चित किमान सुविधा यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. मतदान केंद्रावर ठळक अक्षरात येथील सुविधांचा फलक मतदार केंद्र क्रमांक, दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत.

(हेही वाचा – Nilesh Rane २३ ऑक्टोबरला करणार शिवसेनेत प्रवेश)

असे असेल मनुष्यबळ

मुंबई शहर जिल्ह्यात १० विधानसभा मतदारसंघ असून एकूण २५३७ मतदान केंद्र आहेत. ह्या मतदार केंद्राला प्रत्येकी एक असे २५३७ बीएलओ आहेत. एकूण ३६४ क्षेत्रीय अधिकारी (Z.O) आहेत. जवळपास १२ हजार ५०० पेक्षा अधिक मनुष्यबळ निवडणूक कामकाजासाठी उपलब्ध आहे.

मतदारांना आवाहन

प्रत्येक मतदाराला सुलभपणे मतदान करता यावे यासाठी मतदार चिठ्ठ्यांचे वितरण करण्यात येत आहे. नागरिकांना मतदान केंद्राविषयी माहिती उपलब्ध करुन द्यावी. ज्या मतदारांचा संपर्क होत नाही त्यांना दूरध्वनी, एसएमएस, व्हॉट्सॲप अशा माध्यमातून संपर्क करण्यात येऊन मतदार केंद्राची माहिती देण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारची मतदारांची गैरसोय होऊ नये. यासाठी दक्षता घेण्यात येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.