सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही Udhayanidhi Stalin म्हणतात, सनातन विरोधी वक्तव्याबद्दल माफी मागणार नाहीच 

94

तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी सनातन आजार असल्याच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने 4 मार्च रोजी उदयनिधी स्टॅलिन यांना फटकारले होते. स्टॅलिन यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. स्टॅलिन हे सामान्य माणूस नाहीत. विधानाच्या परिणामांचा विचार त्यांनी करायला हवा होता.

(हेही वाचा Assembly Election : शेकापचा मविआला बाय बाय; रायगड जिल्ह्यासह सांगोल्यात होणार परिणाम; 5 उमेदवार केले जाहीर)

याविषयी बोलताना स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) म्हणाले, पेरियार, अन्नादुराई आणि करुणानिधी यांनीही सनातनबद्दल जे सांगितले तेच मी बोललो. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे उदयनिधी म्हणाले. तामिळनाडूसह देशभरात अनेक न्यायालयीन खटले सुरू होते. मला माफी मागण्यासही सांगण्यात आले होते, पण मी कलैगनर (कला अभ्यासक) यांचा नातू आहे. मी माफी मागणार नाही. माझ्या टिप्पण्यांचा उद्देश महिलांवरील कथित अत्याचारी प्रथा दर्शविण्याचा होता. हिंदू धर्मात स्त्रियांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. त्यांना घराबाहेर जाता येत नव्हते आणि त्यांचे पती मेले तर त्यांनाही मरावे लागले. पेरियार यांनी या सगळ्याविरोधात आवाज उठवला होता, असे स्टॅलिन म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.