विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुणे पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरात मोठी कारवाई केली आहे. रांजणगाव एमआयडीसी परिसरात बेकायदेशीर राहणाऱ्या २१ बांग्लादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांमध्ये १४ पुरुष, ४ महिला आणि दोन तृतीयपंथीयांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांकडे बोगस मतदान कार्ड आणि आधारकार्ड मिळून आल्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे. (Bangladeshi Infiltrators)
(हेही वाचा- सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही Udhayanidhi Stalin म्हणतात, सनातन विरोधी वक्तव्याबद्दल माफी मागणार नाहीच )
अजमुल सरतखान उर्फ हसिफ खान वय ५० वर्षे, मोहम्मद अकबर अजीज अकबर सरदार वय ३२ वर्षे, शफिकउल अलीमिया शेख वय २० वर्षे हुसेन मुखिद शेख वय ३० वर्षे, तरिकुल अतियार शेख वय ३८ वर्षे मोहम्मद उमर फारूख बाबु उर्फ बाबु बुकतीयार शेख वय ३२ वर्षे, शाहिन शहाजान शेख वय ४४ वर्षे, मोहम्मद हुसेन शेख वय ३२ वर्षे, रौफ अकबर दफादार वय ३५ वर्षे, इब्राहिम काजोल शेख वय ३५ वर्षे, फरीद अब्बास शेख वय ४८ वर्षे,मोहम्मद सद्दाम अब्दुल सखावती वय ३५ वर्षे, मोहम्मद अब्दुल हबीब रहेमान सरदार वय ३२ वर्षे, आलीमिया तोहकील शेख वय ६० वर्षे, मोहम्मद इसराईल फकीर वय ३५ वर्षे, फिरोजा मुताकीन शेख वय २० वर्षे, लिपीया हसमुख मुल्ला वय ३२ वर्षे, सलमा मलीक रोशन मलीक वय २३ वर्षे, हिना मुल्ला जुल्फीकार मुल्ला वय ४० वर्षे, सोनदिप उर्फ काजोल बासुदिप बिशेश वय ३० वर्षे, येअणुर शहदाता मुल्ला वय २५ वर्षे, असे अटक करण्यात आलेल्या बेकायदेशीर राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांची नावे आहेत. ही बांग्लादेशियांची टोळी पुण्यातील शिरूर तालुका,कोरेगाव येथे राहण्यास होती. हे सर्वजण मूळचे बांगलादेश देशाचे नागरिक आहे. (Bangladeshi Infiltrators)
सोमवारी दहशतवाद विरोधी शाखा पुणे ग्रामीण चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार हे आपल्या पथकासह रांजणगाव पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये पेट्रोलींग करत असताना त्यांचे पथकातील सहा. फौज. विशाल गव्हाणे यांना गोपनीय माहिती मिळाली की, रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारेगावच्या परिसरात काही बांगलादेशी नागरीक हे बेकायदेशीरपणे रहात आहेत अशी खात्रीलायक माहिती मिळाली होती. सदर मिळालेल्या माहितीवरून पथकाने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांचे मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखे मधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील अंमलदारांसह कारेगाव परीसरामध्ये मिळालेल्या बातमीच्या आधारे संशयीत बांगलादेशी नागरिकांचा शोध घेतला, दरम्याम कारेगावच्या हद्दीमध्ये भाड्याने राहण्यास असणारे १५ पुरुष, ०४ महिला व ०२ तृतीयपंथींना ताब्यात घेण्यात आले आहेत. (Bangladeshi Infiltrators)
सदर इसमांना पोलीस ठाण्यात आणुन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता सदरचे इसम हे बांगलादेशी नागरीक असुन त्यांनी भारत देशात बेकायदेशीररित्या भारत बांगलादेश सिंमा ओलांडुन कोणताही वैध्य भारतीय पारपत्र परवाना धारण करत नसताना देखील भारतामध्ये प्रवेश करून महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हयातील कारेगाव ता. शिरूर येथे बनावट भारतीय देशाचे आधारकार्ड, पॅनकार्ड व मतदानकार्ड तयार करून वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यापैकी ०९ इसमांकडे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड व ०१ इसमाकडे बनावट मतदानकार्ड मिळुन आले आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात एवढ्या मोठया प्रमाणात बांगलादेशी नागरिक मिळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे . हे बांगलादेशी मागील काही महिन्यांपूर्वी पुण्यात आले असून त्यांचा या ठिकाणी बोगस कागदपत्राच्या आधारे राहण्याचा उद्देश अद्याप समजू शकला नसला तरी निवडणूका जवळ आल्यानंतर बांगलादेशातून मोठया प्रमाणात नागरिकांना भारतात आणून त्यांचे खोटे मतदान कार्ड, आधारकार्ड बनवून त्यांना ठेवले जात असल्याची चर्चा पुण्यात होत आहे. (Bangladeshi Infiltrators)
(हेही वाचा- Maharashtra Assembly Election 2024 : पहिल्याच दिवशी राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ अर्ज दाखल )
अटक करण्यात आलेल्या बांग्लादेशी नागरिकविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्याचा शोध सुरू आहे. (Bangladeshi Infiltrators)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community