बडतर्फ पोलीस अधिकारी Sachin Waje याला जामीन मंजूर

117
बडतर्फ पोलीस अधिकारी Sachin Waje याला जामीन मंजूर
बडतर्फ पोलीस अधिकारी Sachin Waje याला जामीन मंजूर

बडतर्फ पोलीस अधिकारी (Dismissed Police Officer) सचिन वाझे याला मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर होऊन देखील वाझेला तुरुंगातून बाहेर पडता येणार नाही. त्याला तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी अजून काही वर्षे लागतील कारण त्याला एका गुन्हयात जामीन मिळाला असला. तरी देशभर गाजलेल्या अँटिलिया बॉम्ब प्रकरण (Antillia Bomb Case) आणि हिरेन मनसुख हत्याकांड (Hiren Mansukh Massacre) प्रकरणात अद्याप जामीन मंजूर करण्यात आलेला नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) आणि इतरांशी संबंधित असलेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात वाझेला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

मार्च २०२१ पासून तुरुंगात असलेले बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला (Sachin Waje) मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (२२ ऑक्टोबर) जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती एमएस सोनक (Justice MS Sonak) आणि जितेंद्र जैन (Jitendra Jain) यांच्या खंडपीठाने वाझे यांना जामीन मंजूर केला, केंद्र सरकारने त्यांची जामिनावर सुटका करण्यास हरकत नसल्याचे म्हटल्यानंतर खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) न्यायालयाला जामिनाच्या अटीवर निर्णय घेण्यास सांगितले आहे.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Poll : सख्ख्या भावांची तिसरी जोडी निवडणूक रिंगणात!)

परंतु या १०० कोटी भ्रष्ट्राचार प्रकरणात वाझेला जामीन मिळाला असला तरी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दाखल केलेल्या अँटिलिया बॉम्ब प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असल्याने वाझे हे तुरुंगात राहणार आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.