काँग्रेस आणि उबाठा गटात जागावाटपावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या (MVA) बैठकीत मंगळवार, २२ ऑक्टोबर रोजी सूत्र निश्चित करण्यात आले. काँग्रेस १०५, उबाठा ९५, तर राष्ट्रवादी (शरद पवार) ८५ जागा लढविण्यावर सहमती झाली आहे, असे समजते. जागावाटपावरून काँग्रेस (Congress) व उबाठा नेत्यांमध्ये (UBT) बैठकीत पुन्हा वादावादी निर्माण झाल्याचे समजते.
(हेही वाचा – Maharashtra Assembly Poll : दिग्गज नेते साधणार गुरूपुष्यामृताचा मुहूर्त….!)
जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्याकरिता महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपनगरातील एका पंचतारांकित हॉटेलात जवळपास चार तास चर्चा झाली. गेल्या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उबाठाचे खासदार संजय राऊत यांच्यात वाद झाला होता. यानंतर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर २२ ऑक्टोबर रोजी पुन्हा बैठक पार पडली. त्यामध्ये चित्र बरेच स्पष्ट झाले असले, तरी अजूनही चार-पाच जागांवर अजून सहमती झालेली नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
विशेषत: विदर्भातील काही जागांवरून दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाले आहेत. तसेच मुंबईतील काही जागांवरही दोन्ही बाजूने ताणले गेल्याने परत चर्चा करण्यात येणार आहे. जागावाटपात काँग्रेस १०५, शिवसेना ९५ तर राष्ट्रवादीला ८० ते ८५ जागांच्या दरम्यान जागा लढविण्याचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. जागावाटपाची अधिकृत घोषणा महाविकास आघाडीकडून बुधवार, २३ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत केली जाणार आहे. डावे पक्ष, समाजवादी पार्टी व अन्य छोट्या पक्षांना तिन्ही पक्षांनी आपापल्या कोट्यातून जागा सोडाव्यात, असा निर्णय झाला आहे, असे समोर येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community