Ind vs NZ, 2nd Test : भारत वि न्यूझीलंड सामन्यावेळी कसं असेल पुण्यातील हवामान?

123
Ind vs NZ, 2nd Test : भारत वि न्यूझीलंड सामन्यावेळी कसं असेल पुण्यातील हवामान?
Ind vs NZ, 2nd Test : भारत वि न्यूझीलंड सामन्यावेळी कसं असेल पुण्यातील हवामान?
  • ऋजुता लुकतुके 

न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत पहिले जवळ जवळ दोन दिवस पावसामुळे फुकट गेले. पावसामुळे पूर्णपणे दमट झालेल्या खेळपट्टीवर भारतीय संघ पहिल्या डावात ४६ धावांतच आटोपला. दुसऱ्या डावात ४६२ धावा करून भारतीय संघाने कसोटीत रंगत निर्माण केली आणि एकतर्फी पराभव टाळला. पण, अखेर तीन दिवसांच्या खेळातच भारताला न्यूझीलंडकडून ८ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे मालिकेत किवी संघ १-० असा आघाडीवर आहे. आता लक्ष दुसऱ्या पुणे कसोटीवर लागलं आहे. (Ind vs NZ, 2nd Test)

(हेही वाचा- Assembly Election 2024 : मतदानासाठी 12 ओळखीचे पुरावे धरणार ग्राह्य)

महाराष्ट्रातही गेले काही दिवस परतीचा पाऊस सुरूच आहे. त्यामुळे पहिलं लक्ष असेल ते पुण्यात गुरुवारी पावसाची शक्यता काय आहे यावर. एक खुशखबर अशी आहे की, या दरम्यान पुण्यात पावसाची थोडीफार शक्यता असली तरी अख्खा दिवस त्यात वाया जाण्याची शक्यता कमीच आहे. (Ind vs NZ, 2nd Test)

Untitled design 15

‘आकाशात सूर्य आणि ढग दोघं राज्य करतील,’ असं हवामान विभागाच्या वेबसाईटवर म्हटलं आहे. पहिल्या दिवशी २४ ऑक्टोबरला सकाळी ५८ टक्के आकाश हे अभ्राच्छादित असेल. तर दिवसभरात ढग कमी होऊन ते ४६ टक्क्यांवर येतील, असा हवामानाचा अंदाज आहे. तर तापमान ३२ अंश सेल्सिअस इतकं असू शकेल. साधारण ९ ते १० किमी ताशी वेगाने वारे वाहतील. वादळी वाऱ्यांची शक्यता मात्र कमीच आहे. (Ind vs NZ, 2nd Test)

(हेही वाचा- Bombay High Court : मुस्लिम पुरुषांच्या एका पेक्षा अधिक ‘विवाहाला’ आता कायद्याची मान्यता! )

भारतीय संघाने या कसोटीसाठी वॉशिंग्टन सुंदर या अष्टपैलू खेळाडूची भारतीय संघात निवड केली आहे. पण, अंतिम ११ मध्ये त्याला स्थान मिळेल का हे २४ तारखेलाच स्पष्ट होईल. तर पहिल्या कसोटीतील पराभवानंतर पुणे कसोटीसाठीची खेळपट्टी ही फिरकीला धार्जिणी बनवली जाईल असा अंदाज व्यक्त होत आहे. (Ind vs NZ, 2nd Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.