Ind vs NZ, 2nd Test : भारत वि न्यूझीलंड पुणे कसोटीची खेळपट्टी कशी असेल?

Ind vs NZ, 2nd Test : मालिकेत भारतीय संघ ०-१ ने पिछाडीवर आहे 

48
Ind vs NZ, 2nd Test : भारत वि न्यूझीलंड पुणे कसोटीची खेळपट्टी कशी असेल?
Ind vs NZ, 2nd Test : भारत वि न्यूझीलंड पुणे कसोटीची खेळपट्टी कशी असेल?
  • ऋजुता लुकतुके 

न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा ३ दिवसांच्या खेळानंतर पराभव झाल्यानंतर बीसीसीआयने दुसऱ्या कसोटीसाठी धिमी खेळपट्टी बनवण्याच्या सूचना पुण्यातील क्युरेटरना दिल्याचं समजतंय. भारतात सामने होणार असतील तर बीसीसीआयचा एक जाणकारांचा चमू खेळपट्‌टीची पाहणी वेळोवेळी करत असतो. सुरुवातीला त्यांनी खेळपट्टीच्या क्युरेटरला, ‘थोडं गवत ठेवा,’ असं सांगितलं होतं. पण, पहिल्या कसोटीतील पराभवानंतर आता याच चमूने खेळपट्टी फिरकीला पोषक ठेवा, असं सुचवलं आहे. (Ind vs NZ, 2nd Test)

(हेही वाचा- Bombay High Court : मुस्लिम पुरुषांच्या एका पेक्षा अधिक ‘विवाहाला’ आता कायद्याची मान्यता! )

भारतीय संघात सध्या मोहम्मद शामी (Mohammad Shami) नाहीए. तर मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) पाहिजे तसा चेंडू स्विंग करू शकत नाहीए. अशावेळी जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah) जादूई स्पेल टाकू शकला तरंच भारतीय संघ तेज गोलंदाजीच्या जोरावर कसोटी जिंकू शकेल. त्याचवेळी खेळपट्टीवर चेंडू अती वळला तरीही ते अंगलट येऊ शकतं.  (Ind vs NZ, 2nd Test)

भारतीय संघ प्रशासनाकडून क्युरेटरला काही सल्ले दिले गेले आहेत का, हे अजून स्पष्ट नाही. तर क्युरेटरही खेळपट्टीबद्दल कुणाशीही काही बोलत नाहीएत. पण, पुण्याच्या या मैदानावर आतापर्यंत दोनच आंतरराष्ट्रीय कसोटी झाल्या आहेत. २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाने ३ दिवसांत भारताचा पराभव केला होता. तर २०१९ मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा ४ दिवसांत पराभव केला होता. थोडक्यात, या खेळपट्टीवर पूर्ण ५ दिवस सामना चाललाय असं अजून तरी झालेलं नाही. खेळपट्टीवर सुरुवातीला गवत ठेवलं असेल तर ते शेवटच्या काही दिवसांत काढून टाकता येऊ शकत नाही. त्यामुळे भेगा पडून खेळपट्टी धोकादायक होऊ शकते. ‘गहुंजे खेळपट्टी सकारात्मक असेल,’ असं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य सचिन मुळ्ये यांनी म्हटलं आहे. (Ind vs NZ, 2nd Test)

(हेही वाचा- Assembly Election 2024 : मतदानासाठी 12 ओळखीचे पुरावे धरणार ग्राह्य)

पारंपरिकदृष्ट्या, पुण्याच्या या खेळपट्टीने आयपीएल आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये गोलंदाजांना मदत केलेली आहे. त्यामुळे आताही न्यूझीलंड विरुद्ध खेळपट्टी महत्त्वाची ठरणार आहे. त्यातच गुरुवारी इथं वाऱ्यांसह पाऊस पडण्याचीही शक्यता आहे.  (Ind vs NZ, 2nd Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.