महाराष्ट्र मुख्यमंत्री पदाचा धुरा हातात घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे तिसऱ्यांदा गुवाहाटी दौऱ्यावर आहेत. दरम्यान, २४ ऑक्टोबर गुरुवार रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी २३ ऑक्टोबर रोजी गुवाहाटी (Guwahati) येथे जाऊन सहकुटूंब कामाख्या देवींचं दर्शन (Eknath Shinde Kamakhya Devi Darshan) घेतलं आहे. या दौऱ्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चां रंगत आहेत. (CM Eknath Shinde)
एकनाथ शिंदेंनी साधला माध्यमांशी संवाद
गुवाहाटी येथे पोहोचताच एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यामांशी उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही कामाख्या देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी गुवाहाटीला आलो आहोत. उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून दुसरी यादीही लवकरच जाहीर होईल. पुढे बोलताना त्यांनी विधानसभा निवडणूकीत विजयाचा विश्वासही व्यक्त केला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित आहे, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले.
(हेही वाचा – Ind vs NZ, 2nd Test : भारत वि न्यूझीलंड सामन्यावेळी कसं असेल पुण्यातील हवामान?)
दरम्यान, मंगळवार २२ ऑक्टोबर रोजी अधिकृत शिवसेना पक्षाची (ShivSena candidate list) ४५ उमेदवारांची विधानसभा निवडणूकीची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मंत्री तसेच बऱ्याच विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community