Ind vs NZ, 2nd Test : रिषभ पंत पुण्यात खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे का?

बंगळुरूमध्ये जाडेजाचा एक चेंडू रिषभच्या दुखऱ्या गुडघ्यावर बसला होता.

29
Ind vs NZ, 2nd Test : रिषभ पंत पुण्यात खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे का?
Ind vs NZ, 2nd Test : रिषभ पंत पुण्यात खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे का?
  • ऋजुता लुकतुके

बंगळुरू कसोटीत रिषभ पंतची (Rishabh Pant) दुखापत हा भारतीय संघासाठी पराभवा इतकाच मोठा धक्का होता. सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) ही दुखापत फारशी गंभीर नसल्याचं स्पष्ट केलं होतं. पण, फलंदाजी करतानाही तो अडखळत होता. शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यावरच चेंडू बसल्यामुळे सगळ्यांना काळजी वाटत होती. भारतीय संघ ४६ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर भारताची गोलंदाजी सुरू झाली. आणि रवींद्र जाडेजाचा (Ravindra Jadeja) एक चेंडू रिषभ पंतच्या (Rishabh Pant) उजव्या पायाच्या गुडघ्यावर बसला. त्यानंतर त्याने मैदान सोडलं आणि त्याच्या ऐवजी ध्रुव जुरेलने यष्टीरक्षण केलं. दुसऱ्या डावात रिषभने ९९ धावा केल्या. पण, शेवटच्या टप्प्यात तो धावताना अडखळत होता. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात तो पुन्हा क्षेत्ररक्षणासाठी उतरला नाही. (Ind vs NZ, 2nd Test)

आता दुसऱ्या कसोटीपूर्वी रिषभच्या तंदुरुस्तीचा मोठा अपडेट सहायक प्रशिक्षक रायन टेन ड्युसकाटे यांनी दिला आहे. ‘तो आता बरा आहे. फक्त धावताना तो धाव संपवतो तेव्हा त्याला थोडा त्रास होतो. पण, बाकी तो बरा आहे. आणि दुसऱ्या कसोटीसाठी तो तयार असेल आणि यष्टीरक्षणही करेल अशी आशा आहे,’ असं ड्यूसकाटे मीडियाशी बोलताना म्हणाला. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी रिषभने वेदनाशामक इंजेक्शन घेतलं होतं. (Ind vs NZ, 2nd Test)

(हेही वाचा – NCP Candidates First List : राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर; अजित पवारांसह ‘ही’ नेतेमंडळी निवडणुकीच्या रिंगणात)

डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या रस्ते अपघातानंतर रिषभ पंतवर (Rishabh Pant) दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यातील एक गुडघ्यावर होती. आणि नेमका तिथेच चेंडू बसल्यामुळे रिषभला त्रास झाला. एवढ्या मोठ्या अपघातानंतर दीड वर्षांत रिषभ मैदानावर परतला आहे. त्यासाठी त्याने मेहनतही घेतली आहे. आता त्याने किती सामने खेळावे आणि कधी विश्रांती घ्यावी याचं योग्य नियोजन करणं हे संघ प्रशासनाचं एक महत्त्वाचं काम आहे.

आताही बीसीसीआयचं वैद्यकीय पथक रिषभ पंतच्या (Rishabh Pant) तंदुरुस्तीवर लक्ष ठेवून आहे. पण, तो वेळेत तंदुरुस्त होईल, अशी आशा त्यांना आहे. ‘रिषभचा गुडधा त्या आघाताने सुजला होता. आणि वेदनाशामक इंजेक्शननी ती जागा काहीशी बधीरही झाली होती. त्यामुळे त्याला धावतानाही त्रास होत होता. पण, आताची दुखापत फारशी गंभीर नाही. २-३ दिवसांत तो बरा होईल, असं बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआयला सांगितलं होतं.’ (Ind vs NZ, 2nd Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.