विधानसभा निवडणुकीसाठी आता महायुती आणि मविआमधील पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या आता प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत. त्याचा वेळी आता बंडाचे निशाण फडकावणारे इच्छूकही समोर येऊ लागले आहेत. त्यातच ज्यांनी एकत्र येण्याचे वादे केले होते, तेही सोडून जाऊ लागले आहेत. मविआमधून समाजवादी पक्ष आणि शेकाप यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आता उबाठासोबत (UBT) असलेल्या संभाजी ब्रिगेडनेही उबाठाची साथ सोडली आहे.
संभाजी ब्रिगेडला जागा मिळाल्या नाहीत
यामुळे संभाजी ब्रिगेड आता विधानसभा निवडणूक स्वबळावर लढू शकते. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीला मदत केली होती. त्यानंतर विधानसभेत आम्ही तुम्हाला पाच ते सहा जागा देऊ असे मविआच्या नेत्यांनी आम्हाला सांगितले होते. या निवडणुकीसाठी आम्ही राज्यभर तयारी केली आहे. आम्ही विदर्भात तीन व मराठवाड्यात तीन जागांची मागणी केली आहे. मात्र आम्हाला एकही जागा मिळत नसेल तर आम्ही या आघाडीत का राहावे? भविष्यात आपल्या राज्याला पुढे न्यायचे असेल तर आमच्या चळवळीचा हातभार लागेल. परंतु, मविआमधील कोणत्याही घटकपक्षाला आमची अथवा आमच्या चळवळीची गरज नसेल तर आम्ही मविआतून बाहेर पडतो, असे म्हटले. (UBT)
Join Our WhatsApp Community