dhanteras special rangoli design : धनत्रयोदशीच्या दिवशी कोणती रांगोळी काढाल?

152
dhanteras special rangoli design : धनत्रयोदशीच्या दिवशी कोणती रांगोळी काढाल?

दरवर्षी धनत्रयोदशी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. या दिवशी लोक धन, समृद्धी आणि आरोग्य मिळविण्यासाठी भगवान धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात. धनत्रयोदशीच्या दिवशी लोक नवीन भांडी, दागिने आणि वाहने खरेदी करतात जेणेकरून त्यांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी यावी.

धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी, भांडी, मालमत्ता, झाडू खरेदी केली जाते. धनत्रयोदशीला संपत्तीची देवता कुबेर आणि धन्वंतरी यांची पूजा विधीपूर्वक केली जाते. या दिवशी संध्याकाळी घराच्या दारावर यमाच्या नावाने दिवे लावले जातात. धनत्रयोदशीच्या काळात लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी नवीन वस्तू खरेदी केल्याने घरामध्ये सौभाग्य, सुख आणि समृद्धी येते, असेही मानले जाते. तसेच घराबाहेर छान छान सुंदर सुंदर रांगोळीही काढली जाते. तुम्ही कोणती रांगोळी काढणार आहात? (dhanteras special rangoli design)

(हेही वाचा – Ind vs NZ, 2nd Test : रिषभ पंत पुण्यात खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे का?)

१. पानांची आणि फुलांची रांगोळी

सर्वप्रथम जमिनीवर तांदळाचा किंवा रव्याचा हलका बेस बनवा, नंतर त्यावर हिरव्या पानांचं वर्तुळ बनवा, मधोमध रंगीबेरंगी फुलं टाकून सुसज्ज करा. ही रांगोळीतून निसर्गिक संपदा प्रतिबिंबीत होते आणि घरात सकारात्मकता येते.

२. स्वस्तिक रांगोळी

स्वस्तिक चिन्ह शुभ मानले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी स्वस्तिक रांगोळीची रचना करू शकता. संध्याकाळच्या पूजेनंतर स्वस्तिक रांगोळी काढा आणि सर्वत्र दिवे लावा. यामुळे तुमच्या घरातलं वातावरण शुभ होईल. (dhanteras special rangoli design)

३. दीपक आणि लक्ष्मी रांगोळी

एका मोठ्या दिव्याचा आकार काढून त्याभोवती लहान दिव्यांचा आकार तयार करा. मग दिव्याच्या आत लक्ष्मी मातेची आकृती तयार करा. आता त्यात सोन्याच्या बांगड्या किंवा दागिन्यांचे चित्र काढा, या रांगोळीतून धनत्रयोदशीचे महत्त्व कळते.

(हेही वाचा – district magistrate म्हणजे काय? काय असते त्यांचे उत्तरदायित्व?)

४. स्वागत रांगोळी

लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी भिंतीच्या किंवा दरवाजाच्या काठावर अर्धे वर्तुळ बनवा. मग त्यावर कलशाची रचना करता येईल. तुम्ही स्वागत रांगोळीची डिझाईन इतरही प्रकारे करू शकता. पार्श्वभूमी तयार करण्यासाठी चाळणी वापरा, ज्यामुळे डिझाइन अधिक आकर्षक होईल.

५. ओम आणि गणपतीची रांगोळी

सर्वप्रथम ओमचा आकार काढा, त्याभोवती गणपतीचे चित्र काढा, रंगीबेरंगी पावडर वापरून ही रांगोळी सजवा, ही रांगोळी श्रद्धा आणि समृद्धीचे प्रतीक आहे. (dhanteras special rangoli design)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.