Prithvi Shaw : मुंबई रणजी संघातून वगळल्यावर पृथ्वी शॉची पहिली प्रतिक्रिया 

Prithvi Shaw : पृथ्वी शॉने इन्स्टाग्रामवर एक संदेश लिहिला आहे

102
Prithvi Shaw : मुंबई रणजी संघातून वगळल्यावर पृथ्वी शॉची पहिली प्रतिक्रिया 
Prithvi Shaw : मुंबई रणजी संघातून वगळल्यावर पृथ्वी शॉची पहिली प्रतिक्रिया 
  • ऋजुता लुकतुके 

एकेकाळी भारतीय संघातून खेळलेला पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आता मुंबई रणजी संघातूनही बाहेर झाला आहे. वजनाने जास्त असल्याचा ठपका ठेवून मुंबई संघातूनही त्याला वगळण्यात आलं आहे. २६ ऑक्टोबरला मुंबईची लढत त्रिपुराशी होणार आहे. आणि त्यासाठी मुंबई संघातून पृथ्वी शॉला वगळण्यात आलं आहे. मुंबई निवड समितीने पृथ्वीला त्याच्या तंदुरुस्तीवर काम करण्यासाठी ‘ब्रेक’ दिल्याचं बोललं जात होतं. पण, त्यानंतर पृथ्वी शॉ ने एक चार शब्दांची इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली आहे. ‘मला ब्रेक हवाय, धन्यवाद,’ इतकेच शब्द आणि एक स्माईली त्याने संदेशात लिहिली होती. ही पोस्ट काही तासातच त्याने डिलिटही केली.

(हेही वाचा- UBT ला धक्का; संभाजी ब्रिगेडने सोडली साथ)

मुंबई क्रिकेट असोसिएशनने पृथ्वी शॉला १५ दिवसांचा एक खास त्याच्यासाठी आखलेला तंदुरुस्तीचा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी सांगितलं आहे. २४ वर्षीय पृथ्वीने मुंबईसाठी इराणी चषकात ४ आणि ७६ धावा केल्या आहेत. तर रणजी करंडकाच्या पहिल्या दोन सामन्यांत मिळून त्याने ५९ धावा केल्या आहेत. सध्या तो मुंबईच्या रणजी संघातून खेळण्याबरोबरच आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि इंग्लिश काऊंटी स्पर्धेत नॉर्दअमपटनशायर काऊंटीसाठी संघांसाठी खेळतो. (Prithvi Shaw)

रणजी करंडक (Ranji Trophy) आणि दुलिप करंडकात पदार्पणातच शतक झळकावण्याची किमया सुरुवातीला पृथ्वीने केली होती. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकवणारा तो वयाने सगळ्यात लहान भारतीय क्रिकेटपटू आहे. पण, मैदानाबाहेरील बेशिस्त वर्तणूक आणि तंदुरुस्ती न राखल्यामुळे भारतीय संघातून तो बाहेर फेकला गेला. २०१८ नंतर तो भारतीय संघातून खेळलेला नाही. आता तर त्याच्यावर मुंबई संघातून बाहेर होण्याची वेळ आली आहे. (Prithvi Shaw)

(हेही वाचा- Maharshtra Assembly Election 2024 : ज्यांनी दिली बंडामध्ये साथ तेच झाले पहिल्या यादीतून बाद; वाचा कोण आहेत ‘ते’ आमदार?)

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाकडून तो नियमितपणे खेळतो. पण, तिथेही या हंगामात तो सातत्यपूर्ण कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळे या हंगामात तो सलग खेळलेला नाही. दिल्ली संघ त्याला लिलावापूर्वी कायम ठेवण्याची शक्यता कमीच आहे. (Prithvi Shaw)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.