- ऋजुता लुकतुके
राष्ट्रकूल खेळ समितीने २०२६ च्या खेळांमधून हॉकी, टेबलटेनिस, कुस्ती आणि बॅडमिंटन सारखे काही लोकप्रिय खेळ वगळण्याचा निर्णय घेतला आहे. वगळलेल्या खेळांमध्ये नेमबाजीचाही समावेश आहे आणि त्यामुळे भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. २०२६ ची राष्ट्रकूल स्पर्धा ग्लासगो इथं होणार आहे आणि एकूण १२ खेळ त्यातून वगळण्यात आले आहेत. ‘२३ वी राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा २३ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ दरम्यान स्कॉटलंडची राजधानी ग्लास्गो इथं होणार आहेत. यंदा या स्पर्धेत १० खेळ असतील आणि ४ मैदानांवर ते भरवले जातील,’ असं फेडरेशनने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. (Commonwealth Games 2026)
Track cycling and boxing are among 10 sports that will be included in the Glasgow 2026 Commonwealth Games – but badminton and hockey have been dropped.
Katie Sadleir, Chief Executive of the Commonwealth Games Federation, spoke to #BBCBreakfast about https://t.co/Qu9JPi1Cs0 pic.twitter.com/kG6YpjhRyN
— BBC Breakfast (@BBCBreakfast) October 22, 2024
(हेही वाचा – Maharshtra Assembly Election 2024 : ज्यांनी दिली बंडामध्ये साथ तेच झाले पहिल्या यादीतून बाद; वाचा कोण आहेत ‘ते’ आमदार?)
ॲथलेटिक्स, जलतरण, जिमनॅस्टिक्स, सायकलिंग, नेटबॉल, भारोत्तोलन, पॉवरलिफ्टिंग, मुष्टीयुद्ध, ज्युदो, बोल्स हे १० प्रकार यंदा असणार आहेत. भारतात लोकप्रिय असलेले हॉकी, नेमबाजी, बॅडमिंटन, टेनिस, टेबलटेनिस यासारखे खेळ राष्ट्रकूल स्पर्धेतून सध्या हद्दपार होणार आहेत. भारतातील आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यामुळे नाराज आहेत. बॅडमिंटनचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी तर राष्ट्रकूल स्पर्धेवर बहिष्कार घालण्याची विनंती ऑलिम्पिक असोसिएशनला केली आहे. (Commonwealth Games 2026)
‘बॅडमिंटन खेळाचा समावेश राष्ट्रकूल स्पर्धेत झाला नाही यामुळे मी खूप निराश झालो आहे. भारताची या खेळांतील प्रगती रोखण्याचाच हा प्रयत्न आहे, असं मला वाटतं. भारताने बॅडमिंटनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली आहे. आताही नवीन खेळाडूंसाठी हे चांगलं व्यासपीठ असू शकलं असतं. पण, ती संधी भारतीय खेळाडूंनी दिली जात नाहीए. याचा आपण निषेध केला पाहिजे. आपण या स्पर्धेसाठी आपला संघ पाठवता कामा नये, असं मला वाटतं,’ गोपीचंदने तातडीने ही प्रतिक्रिया दिली आहे. तर गगन नारंग, दिपिका पलिकल, हरमनप्रीत सिंग आणि शरथ कमल या महत्त्वाच्या खेळाडूंनीही अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे. (Commonwealth Games 2026)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community